Visa | Representational Image | (Photo Credits: PTI)

अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रम्प सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काल ट्र्म्प सरकारने यंदा ऑनलाईन माध्यमातून सुरू असलेल्या कोर्सच्या विद्यार्थ्यांचा F-1 आणि M-1 visa रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान आता सप्टेंबर 2020 पासून परदेशात Fall 2020 सेमिस्टरला सुरूवात होते. अमेरिकेमध्येही जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात मात्र यंदा त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे.

F-1हा व्हिसा शिक्षणासाठी येणार्‍यांना दिला जातो तर M-1 व्हिसा हा व्होकेशनल कोर्ससाठी येणार्‍या अनिवासी अमेरिकन विद्यार्थ्यांना दिला जातो. दरम्यान F-1 visa धारकांना आता अमेरिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. डॉनल्ड ट्र्म्प यांनी H1B सह तात्पुरते Work Visas वर्षअखेरीपर्यंत केले रद्द; जाणून घ्या भारतातील तरूणांना त्याचा कसा बसणार फटका?

ANI Tweet

भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी टेक्नॉलॉजी, फार्मसी सारख्या विषयांमध्ये अमेरिकेमध्ये  उच्च शिक्षणासाठी जातात. सध्या शिक्षण व्हिसावर 11 लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत. दरम्यान अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीन पाठोपाठ भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा या देशातून सर्वाधिक विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होत असतात.

जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे अमेरिकेमध्ये आहेत. दिवसागणिक तेथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. सोबतच शिक्षण  क्षेत्राला देखील फटका बसला आहे.