Rapper Kanye West With Kim Kardashian | (Photo Credits: Instagram)

जगप्रसिद्ध असलेला अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट (Rapper Kanye West) या वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार आहे. कान्ये वेस्ट याने नुकतीच ही घोषणा केली. विशेष असे की, कान्ये याने ही घोषणा करताच त्याची पत्नी Kim Kardashian (किम कार्दशियन) हिने आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मास्क (Tesla CEO Elon Musk) यांनी त्याला ताबडतोब पाठिंबाही दिला. कान्ये याने ट्विट करत शनिवारी (4 जुलै) म्हटले की, आता आपण परमेश्वारावर विश्वास ठेऊन, समविचारी नागरिकांनी एकत्र येत आपल्या भविष्य निर्मितीसाठी अमेरिकेला दिलेली वचनं आठवायला हवीत. मी संयुक्त राष्ट्रसंघ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहे'. कान्ये याने ट्विटसोबत 2020 व्हिजन हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, कान्ये याने ट्विट करताच टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मास्क यांनी त्याला पाठिंबा देत म्हटले की, तु्म्हाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यासोबतच वेस्ट यांची पत्नी आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कारदिशायन हिनेही कान्ये याला आपला पाठिंबा दर्शवला. किमने कान्ये याला पाठिंबा दर्शवताच अमेरिकेत तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. काही अमेरिकी नागरिक तर तिला अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणू लागले आहेत. तर काहींनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. (हेही वाचा, Donald Trump Jr यांची गर्लफ्रेंड Kimberly Guilfoyle ला कोरोना विषाणूची लागण; सध्या दोघेही आयसोलेशनमध्ये)

किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये विवाह केला. मात्र, कान्यासोबत विवाह करण्यापूर्वी किमची दोन लग्न झाली आहेत. तिने डॅमन थॉमस याच्यासोबत 2000 मध्ये पहिला विवाह केला. 2004 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर तिने क्रिस हंपेरिस याच्यासोबत विवाह केला. हा विवाह 2011 मध्ये पार पडला आणि 2013 मध्ये त्यांच्यात काडीमोडही झाला.

. दरम्यान, कान्ये याने 2015 मध्येच राष्ट्राध्यक्ष होण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. कान्ये यांनी तेव्हा ट्विट केले होते की, एक दिवस मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईन. 21 वेळा ग्रॅमी विजेता ठरलेल्या या रॅपरला कोणता पक्ष मैदानात उतरवणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणी प्रवेश करावा यासाठी अद्याप कोणीही अधिकृत सीमा निश्चित नाही. मात्र, उमेदवारांनी काही औपचारिकता पूर्ण कराणे गरजेचे असते.