Pfizer's COVID-19 Vaccine घेतलेल्या युके मधील दोन जणांना अॅलर्जिक रिअॅक्शन; MHRA ने दिल्या 'या' सूचना
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

फायझरची (Pfizer) BNT162b2 लस दिलेल्या दोन जणांना अॅलर्जिक रिअॅक्शन (Allergic Reactions) झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे युकेच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने (UK's Medicines and Healthcare products Regulatory Agency) महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. अॅलर्जी होण्याची संभावना असलेल्या लोकांनी ही लस घेऊ नये असे MHRD ने म्हटले आहे. ब्रिटनमध्ये या लसीला 2 डिसेंबर रोजी मंजूरी मिळाली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

"कोणत्याही नवीन लसीमध्ये रिअॅक्शन होण्याची संभावना असते. त्यामुळे MHRA ने अॅलर्जिक रिअॅक्शन होण्याची संभावना असणाऱ्या व्यक्तींना लस घेण्यास मनाई केली आहे. फायझर लस घेतल्यानंतर दोन व्यक्तींना अॅलर्जिक रिअॅक्शन दिसन आली. त्या दोन्ही व्यक्ती आता रिकव्हर होत आहेत," अशी माहिती नॅशनल मेडिकल डिरेक्टर प्रोसेसर स्टीफन पॉव्हिस (Stephen Powis) यांनी Evening Standard शी बोलताना दिली.

90 वर्षीय Margaret Keenan आणि 81 वर्षीय William Shakespeare हे लसीचा डोस घेणारे पहिले दोन व्यक्ती आहेत. युकेच्या कोरोना व्हायरसच्या लढ्यामध्ये आज आपण खूप महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरातील कोरोना बाधित रुग्णांपैकी पहिल्या दोन रुग्णांना आम्ही आज लस देत आहोत, अशी माहिती युके चे पंतप्रधान Boris Johnson यांनी दिली.

युके मध्ये लसीचे 8 लाख डोसेस उपलब्ध आहेत. यांचा वापर 4 लाख रुग्णांसाठी होऊ शकतो. 80 वर्षावरील हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवक आणि व्हॅक्सिनेशन स्टाफ यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. (Pfizer COVID-19 Vaccine ला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची कंपनीकडून मागणी)

दरम्यान, फायझरच्या लसीला बहरीन देशातही मंजूरी देण्यात आली आहे. तसंच फायझरने भारतात देखील आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.