Strap On Penis वापरून ट्रान्सजेंडर व्यक्ती कडून 3 महिलांची Sexual Relationship मध्ये फसवणूक; कोर्टाने सुनावली 10 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा
Representative image

युके मध्ये ट्रांसजेंडर असलेल्या एका व्यक्तीला Prosthetic Penis वापरून तीन महिलांना सेक्शुअल रिलेशनशीप मध्ये फसवल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याला 10 वर्षांची जेलवारी झाली आहे. या व्यक्तीचं नाव Tarjit Singh आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्याचा जन्म Hannah Walters म्हणून स्त्री चा झाला होता. पण आता तो पुरूष झाला आहे आणि त्याने जून 2010- मार्च 2016 मध्ये 3 महिलांना फसवले आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला Snaresbrook Crown Court मध्ये झालेल्या खटल्यानंतर सिंगला घुसखोरी करून प्राणघातक हल्ला केल्याच्या तीन गुन्ह्यांमध्ये, शारीरिक इजा करण्याच्या सहा गुन्ह्यांमध्ये आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या एका गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले आहे.

सिंगने एका पीडितेवर एका द्रव पदार्थाने हल्ला केल्यानंतर आणि नंतर मोबाईल फोनने तिचे नाक फ्रॅक्चर केल्यानंतर तिला पेटवण्याची धमकी दिली. तिला मारहाण देखील केली. आपल्या निकालात, न्यायाधीश म्हणाले की, स्पष्टपणे आणि लिंगाबद्दल प्रामाणिकता दाखवण्याऐवजी सिंगने फसवणुकीचा मार्ग निवडला. त्यानुसार, सिंगला 10 वर्षे तुरुंगवास आणि आणखी तीन वर्षे लायसन्स लागू केले जाणार आहे. तसेच अहवालानुसार Sexual Harm Prevention Order देखील लागू करण्यात आले आहेत.

पीडितेने कोर्टात दिलेल्या जबाबामध्ये "त्यावेळी मी फक्त 16 वर्षांची होते आणि माझ्या आयुष्यातील अतिशय असुरक्षित ठिकाणी होते. सिंगने याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला. या घटनेचा मानसिक दृष्ट्या मला अधिक त्रास झाल्याचं पीडीतेचं म्हणणं आहे. नैराश्य आणि Anxiety ने ग्रस्त असलेली पीडित तरूणी बराच काळ बाहेर पडायला धजावत नव्हती. यामुळे शिक्षण, कॉलेज पूर्ण करू शकली नाही. दुसर्‍या पीडीतेने या रिलेशनशीप मधून बाहेर पडणं कठीण असून आयुष्य पुन्हा सुरू करणं कठीण झाल्याचं म्हटलं आहे. एकीचा या ट्रायल्स पूर्वी गर्भपातही झाला आहे. सतात तिच्या डोक्यात Hannah असल्याने हा मानसिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक अनुभव होता. नक्की वाचा: Paedophiles in French Church: फ्रांसच्या चर्चमध्ये हजारो पाद्री आणि स्टाफकडून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा .

मीडीया रिपोर्ट्सनुसार आरोपी आणि एका पीडितेची यांची सोशल मीडियाद्वारे आणि चिकनच्या दुकानांमध्ये भेट झाली. तर एकीला डेटींग साईट वर आमिष दाखवण्यात आले.