BREXIT: थेरेसा मे यांना मानहानिकारक पराभवानंतर दिलासा, अविश्वासदर्शक ठराव नामंजूर
File image of UK Prime Minister Theresa May (Photo Credits: PTI)

BREXIT: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (Theresa May) यांना ब्रेग्झिट कराराबाबतीत मानहानिकारक पराभव स्विकारल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सरकार विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाला नामंजूरी मिळाली असून 19 मतांच्या फरकाने थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात मोठे यश आले आहे. यामुळे विरोधकांकडून पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुक घेण्याचा डाव फसला आहे.

विरोधी पक्षनेते, मजूर पक्षातील जेरमी कोर्बीन यांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्यामुळे 306 जणांकडून ठरावाच्या बाजूने तर 325 जणांनी विरोध केला होता. तर डिसेंबर 2018 मध्ये त्यांच्या हुजुर पक्षाच्या खासदारांनी हा अविश्वास ठराव प्रस्तावित केला होता. मात्र खासदारांच्या प्रस्तावाल मोडीत काढत थेरेसा मे यांना विजय मिळाला आहे. तसेच ठराव फेटाळला गेल्यास पुढच्या आठवड्यात याबाबत पुन्हा नवा पर्याय घेऊन सभागृहात उपस्थिती लावणार असल्याचे सांगितले होते.

ब्रेग्झिटबाबत थेरेसा मे यांना धक्का बसला होता. त्यावेळी संसदेत 433 विरुद्ध 202 असा मानहानिकारक पराभव त्यांना स्विकारावा लागला होता. तर ब्रिटच्या बाजूने 2016 ब्रेग्झिटसाठी घसरता कौल दिल्याने थेरेसा मे यांनी युरोपीयन महासंघाशी दोन वर्ष वाटाघाटी केल्या. त्यानंतर मंगळवारी हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पुन्हा एकदा मतदान झाल्याने थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात यश आले आहे.