
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) स्वतःचे सोशल मीडिया अॅप लॉन्च करणार आहेत. या अॅपला त्यांनी 'ट्रुथ सोशल' (TRUTH Social) असे नाव दिले आहे. सांगितले जात आहे की ट्रम्प यांचा हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसारखाच असेल, ज्यावर वापरकर्ते त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. ट्विटर आणि फेसबुकने बंदी घातल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःची सोशल मीडिया साइट सुरू करण्याविषयी भाष्य केले होते. कंपनीचे म्हणणे आहे की ते एक ऑन-डिमांड सेवेची योजना आखत आहे, ज्यात मनोरंजन प्रोग्रामिंग, बातम्या आणि पॉडकास्टचा समावेश असेल
ग्रुपच्या मते, या अॅपची मालकी ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) कडे असेल. याबाबत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'मोठ्या कंपन्यांच्या जुलूमाला तोंड देण्यासाठी मी ट्रुथ सोशल आणि टीएमटीजीची स्थापना केली. आपण अशा जगात राहत आहोत जिथे ट्विटरवर तालिबानची मोठी उपस्थिती आहे, तर तुमच्या आवडत्या अमेरिकेच्या अध्यक्षांना शांत करण्यात आले.’ डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ची बीटा आवृत्ती नोव्हेंबरमध्ये निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.
असे मानले जाते की 2022 च्या पहिल्या तिमाहीत हे अॅप अमेरिकेत लॉन्च केले जाईल. यामध्ये एक व्हिडिओ सेवा देखील सुरू केली जाईल जी सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. ट्रम्प मीडिया आणि तंत्रज्ञान समूहाचे एकूण मूल्य 1.7 अब्ज डॉलर्स असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Corona Virus Update: अखेर अमेरिकेने 19 महिन्यांनंतर भारतीयांसाठी उघडले दरवाजे, 'या' तारखेपासून करु शकतात प्रवास)
ट्रम्प यांना 6 जानेवारीपासून सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन संसदेची तोडफोड करणाऱ्या जमावाला भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तेव्हापासून ती सोशल मीडियावर परतण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. याआधी मे महिन्यात ट्रम्प यांनी 'फ्रॉम द डेस्क ऑफ डोनाल्ड जे ट्रम्प' नावाचा ब्लॉग सुरू केला होता. जो एक प्रमुख आउटलेट असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर ट्रम्प यांना इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवरही बंदी घालण्यात आली, ज्यामुळे त्यांनी एका महिन्यानंतर त्यांचा ब्लॉग बंद केला.