गलवानच्या खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीनी सैनिकांच्या झटापटीच्या ठिकाणी एका ट्रॅव्हल ब्लॉगरने फोटो काढल्याने त्याला 7 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्याच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्याने चीनी सैनिकांचा अपमान केला आहे. ज्यावेळी सुरुवातीला चीनी सैनिकांची भारतीय जवानांसोबत झटापट झाली होती तेव्हा त्यांनी नुकसान झाले नसल्याचे म्हटले. मात्र नंतर त्यांनी ती गोष्ट मान्य करत शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ समाधी बांधली.(भारताची मारक क्षमता वाढणार, रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची डिलिव्हरी सुरू)
ट्रॅव्हल ब्लॉगरने शहीद जवानांच्या समाधीजवळ काही फोटो काढले होते. परंतु त्याचे हे फोटो जवानांच्या सन्माला ठेच पोहचवल्यासारखे असल्याचा आरोप लावण्यात आला. समाधीचे स्थळ हे काराकोरम पर्वतीय क्षेत्रात आहे. तर ट्रॅव्हल ब्लॉगरने समाधी स्थळाचे नाव लिहिलेल्या दगडावर चढला होता. त्याचसोबत शहीद जवानांच्या समाधीजवळ उभे राहून हसत फोटो काढला. तरुणाला उत्तर पश्चिम चीनच्या झिंजियांग उइगर क्षेत्रातील पिशान काउंटीच्या स्थानिक कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. असे सुद्धा आदेश दिले आहेत की, 10 दिवसांच्या आतमध्ये ट्रॅव्हल ब्लॉगरने सार्वजनिक रुपात माफी मागावी.
फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर किजिआन याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 22 जुलै रोजी याच्या तपासाचे आदेश दिले गेले होते. आता तो दोषी असल्याचे मानत त्याला सात महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.