
Trash Balloons War : दक्षिण कोरियात कचरा फेकण्यासाठी फुगे (Trash Balloon)वापरणाऱ्या उत्तर कोरिया(South Korea)ला अद्दल घडवण्यासाठी दक्षिण कोरियाने एका नव्या मोहीनेची घोषणा केली आहे. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, ते दक्षिण कोरिया(North Korea)च्या सीमावर्ती भागात उत्तर कोरियाविरोधी प्रचारासाठी लाउडस्पीकरचा वापर पुन्हा सुरू करणार आहेत. उत्तर कोरियाने मोठ्या फुगांच्या सहाय्याने कचर्याची पोतीच दक्षिण कोरियात पाठवली होती. ज्यात, खराब झालेल्या वस्तू, कागदाचे पत्रे, प्लास्टिकच्या बाटल्या, बॅटरी, बूटांचे भाग आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होता.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक चांग हो-जिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन सुरक्षा बैठकीनंतर सीमावर्ती भागात लाऊडस्पीकर लावून प्रसारित करण्यास अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली असल्याचे सोलच्या अध्यक्षीय कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. लाऊडस्पीकर मोहीमेत के-पॉप संगीत, देशा बाहेरील बातम्या, दोन देशांमधील लष्करी वाद, यांचा समावेश असेल. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग विरोधी प्रसारणासाठी दक्षिण कोरिया लाऊडस्पीकर वापरू शकतो. कारण, उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग इथूनच हे फूगे उडवण्यात आले होते.
दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाने या आधीही शेकडो कचरा वाहून नेणारे फुगे दक्षिण कोरियामध्ये पाठवले होते. मे महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियाकडून देशात अशा प्रकारची तिसऱ्यांदा परिस्थीती निर्माण करण्यात आली. उत्तर कोरियाची कृती स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीरपणे धोक्यात आणत आहेत, असे त्यावेळी दक्षिण कोरियाने म्हटले होते. कचर्यांच्या फुग्यांमुळे उद्भवणारी सर्व जबाबदारी संपूर्णपणे उत्तर कोरियाची आहे. त्यांनी तत्काळ अमानवीय कृत्य थांबवावे, असा इशाराही दक्षिण कोरियाने दिला होता.
दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या मते, 2015 मध्ये, जेव्हा दक्षिण कोरियाने अकरा वर्षांत प्रथमच लाऊडस्पीकर प्रसारण सुरू केले, तेव्हा उत्तर कोरियाने सीमेपलीकडून तोफा सुरू केल्या होत्या. ज्यामुळे दक्षिण कोरियाने प्रत्युत्तर देत पुन्हा लाऊडस्पीकर सुरू केले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियात उत्तर कोरियाकडून आतापर्यंत 1,000 हून अधिक फुगे कचरा आणि खत टाकून दक्षिणेकडे पाठवले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशातं तणावाची परिस्थिती मिर्माण झाला आहे. येत्या काळात परिस्थिती निवळेल की आणखी चिघळेल हे पाहावं लागले.अशी चिंता, अल जझीराने नोंदवली आहे.