टॅक्सी बेदरकारपणे चालवत ती जाणवपूर्वक कबुतरांच्या थव्यात घालून अनेक कबुतरांची (Pigeon) हत्या केले प्रकरणी टॅक्सी चालकास अटक (Tokyo Taxi Driver Arrested) करण्यात आली आहे. अत्सुशी ओझावा असे त्याचे नाव आहे. ही घटना टोकियो येथे घडली. आरोपी 50 वर्षांचा आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अनेकदा वन्य प्राणी आणि पक्षी मानवी राग, लोभाचे शिकार होताना दिसतात. कधी ते वाहनाखाली आल्याने ठार होतात. कधी शिकार, अपघात अथवा विषबाधा होऊन ठार होतात.
रस्त्यावर दिसले विचलीत करणारे दृश्य
अत्सुशी ओझावा याने आपल्या टॅक्सीचा वेग अचान ताशी 60 किलोमीटर (37 मैल) ने वाढवला. रहदारीतून जाताना फुटपाथवर बसलेल्या कबुतरांच्या थव्यावरुन त्याने अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे टॅक्सी चालवली. टॅक्सीचा वाढलेला आवाज ऐकून रस्त्यावरील पादचारी जागेवरच थांबले असता त्यांना जे दृश्य दिसले ते विचलीत करणारे होते. एक टॅक्सी कबुतरांच्या थव्यावरुन निघाली होती. ज्यामध्ये अनेक कबुतरे जखमी झाली आणि काहींचा जागीच मृत्यू झाला. अनेकांनी या घटनेचे वर्णन 'अत्यंत दुर्दैवी' असे केले आहे. (हेही वाचा, कल्याण: कबूतराच्या जीवाशी क्रूरतेने खेळणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल)
टॅक्सीचालकाचे वर्तन हानीकारक
टॅक्सीचालकाचे वर्तन हे हेतुपुरस्सर आणि हानी पोहोचविणारे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे. त्याने वन्यजीव संरक्षण कायद्यांचे उल्लंघन केले आहेच. शिवाय रस्ते वाहतूक नियम आणि कायद्याचेही त्याने उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. (हेही वाचा, Mumbai: मुंबईत 40 कबुतरे चोरून जास्त भावाने विकल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक)
कबुतरांचेही पोस्टमार्टम
दरम्यान, घटनेत जखमी झालेल्या कबुतरांवर पशुवैद्याद्वारे उपचार सुरु आहेत. तर, मृत कबुतरांचे शवविच्छेदन केले जाणार आहे. मृत्यूचे कारण जोराजा धक्का असे करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, टॅक्सीचालकाने एक अजबच युक्तीवाद केला आहे. त्याचे म्हणने असेकी, रस्ते माणसांसाठी असतात. कबुतरांसाठी आणि पक्षांसाठी नव्हे. त्यामुळे त्यांनी हा रस्ता सोडून इतर ठिकाणी बसायला हवे होते. चालकाने बचावासाठी केलेला युक्तीवाद पाहून पोलीसांनी अचंबीत होत आरोपीच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
टॅक्सी चालकाच्या कृतीमुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी कायदा अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. सध्यास्थितीत तरी पोलिसांनी त्याला अटक केली असून, कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्ट त्याच्याबाबत काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे.