pigeon | (Photo credits: Facebook)

कल्याण (kalyan) इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीत कबूतरांना (pigeon) अत्यंत निर्दयी आणि क्रूर पद्धतीने जखमी करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्राणी मित्र (Animal Activist) विमलेश नवानी (Bimlesh Navani) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Kolshewadi police station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कल्याण येथील विठ्ठलवाडी (Vitalwadi ) परिसरात असलेल्या श्रीहरी कॉम्पलेक्स हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने कबुतराच्या पायाला दोरी बांधून त्याला उलटे टांगले होते. हा प्रकार पाहून अस्वस्थ झालेल्या विमलेश यांनी थेट पोलीसांत धाव घेऊन महिलेविरोधात तक्रार दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विमलेश यांनी सांगितले की, पायाला दोरी बांधून उलटे टांगलेल्या अवस्थेत ते कबूतर सुमारे 7 ते आठ तास लटकत होते. जीव वाचविण्यासाठी केलेल्या केविलवाण्या फडफडीमध्ये कबुतर सातत्याने खिडकीच्या गजांवर, काचांवर आपटत होते. अखेर कबूतराच्या शरीरातून रक्त निघू लागले. कबूतराचे संपूर्ण अंग रक्ताने माखले. हे रक्त खिडकीवरही ओघळले होते, असेही विमलेश यांनी सांगितले. (हेही वाचा, डेव्हिड लॉएड या छायाचित्रकाराने पटकावला ‘Wildlife Photographer Of The Year’ चा किताब)

दरम्यान, मुक्या प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायदा 1960 कलम 11 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आपल्या घराच्या खिडकीत कबुतरं येता आणि प्रचंड घाण करतात. त्यामंळे आपल्याला संताप आला आणि कबुतरांना धडा शिकविण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचा धक्कादायक खुलासा आरोपी महिलेने केला आहे. परंतू, हा खुलासा अत्यांत खेदजनक असून न पटणारा असल्याचे विमलेश यांनी म्हटले आहे.