दोन सिंहाचे हे छायाचित्र पाहिलेत. हा फोटो साधासुधा नाही. या फोटोने जिंकला आहे यंदाचा यंदाचा ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर’ (Wildlife Photographer Of The Year) हा पुरस्कार. हे छायाचित्र टीपले आहे जगप्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड लॉएड (David Lloyd). लंडन येथील ‘बाँड ऑफ ब्रदर्स’ त्याच्या फोटोला असंख्य लोकांकडून पसंती मिळाली आहे. केवळ मानवालाच नव्हे तर, प्राण्यांनाही भावना असतात. त्या केवळ असत नाहीत तर, त्या ते व्यक्तही करतात, असे सांगणारे हे छायाचित्र.
आपण टीपलेल्या या छायाचित्राला ' वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबाबाबत छायाचित्रकार र डेव्हिड लॉएड याने आनंद व्यक्त केला आहे. आतापर्यंत जगभरातील असंख्य लोकांनी या छायाचित्राचे कौतुक करत त्याला पसंती दिली आहे. या स्पर्धेसाठी 2018 मध्ये 95 देशांतील सुमारे 45 हजार छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे पाठवली होती. निवडसमितीने त्यातील 25 फोटो निवडले. (हेही वाचा, चित्तथरारक व्हिडिओ: बिबट्याचा चार जणांवर हल्ला, नाशिक येथील सावरकरनगर धोका टळला तरीही भीतीच्या छायेत)
जगभरातील हजारो फोटोंपैकी सर्वोत्तम 25 छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्या 25 मध्ये डेव्हिडच्या छायाचित्राने अव्वल क्रमांक पटकावला. इतर ४ फोटो हे लोकप्रिय फोटो म्हणून निवडण्यात आले आहेत. त्यांना फोटोग्राफर ऑफ द इअर हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.