Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

अमेरिकेतील (America) टेक्सास (Texas) परिसरात 2 व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. गोळीबाराची ही घटना टेक्सास येथील मिडलॅन्डजवळील ओडेसा येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तींनी अगोदर वाहन पळवले. त्यानंतर लोकांवर गोळीबार करायला सुरुवात केली. यापैकी एका व्यक्तीला पोलिसांनी ठार करुन दुसऱ्या व्यक्तीचा तपास करत आहेत. सध्या अमरिकेतील पोलिसांनी या परिस्थीतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असल्याचे सांगितले जात आहे.

माहितीनुसार, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या सैनिकांनी एका वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वाहन थांबवताच वाहनातील दोघांनी गोळीबार करायला सुरुवात केली. दरम्यान एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच काही पोलिसही जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला होता. परंतु केवळ 2 व्यक्तींनी हा हल्ला केल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून एका 30 वर्षीय व्यक्तीला ठार केले असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्या मागचे नेमके उद्देश काय? अद्याप याची माहीती समोर आली नाही. हे देखील वाचा- धक्कादायक! डॉक्टरने केले तब्बल 250 मुलांचे लैंगिक शोषण, अनेकांवर बलात्कार; बाल अत्याचाराबाबत देशातील सर्वात मोठे प्रकरण

डोनाल्ड ट्रंपचे ट्विट-

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी याप्रसंगी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसेच याआधी अमेरिकेत घडलेल्या गोळी हल्ल्याबदल सांगितले आहे. डोनाल्ड ट्रंप म्हणाले की, यावर्षी ऑगस्ट महिन्यात टेक्सासशहराजवळील एल पासो या ठिकाणी गोळीबार झाला होता. त्यामध्ये 21 निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. तसेच 24 लोक गंभीर स्वरुपात जखमी झाले होते.