प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

एका 66 वर्षीय व्यक्तीला बाल लैंगिक अत्याचाराच्या (Child Sexual Abuse) प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. गेल्या एक दशकाहून अधिक कालावधीसाठी ही व्यक्ती अशा लहान मुलांवर अत्याचार करत होती. 2017 साली चार व सहा वर्षांच्या दोन मुलींवर या व्यक्तीने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप ठेवण्यात आला, त्यावेळी या व्यक्तिला अटक झाली. जोएल ले स्कॉर्नेक (Joël Le Scouarnec) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती फ्रान्स (France) देशाची रहिवाशी असून महत्वाचे म्हणजे ही व्यक्ती डॉक्टर आहे.

पोलिसांनी ताब्याक्त घेतल्यावर, ‘आपण या मुलींवर बलात्कार नाही तर त्यांच्या शारीरिक अत्याचार केला’ असे या व्यक्तीचे म्हणणे आहे. मात्र तपासणीदरम्यान या व्यक्तीच्या डायरीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे, या व्यक्तीने आतापर्यंत तब्बल 250 मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. होय, आपण डॉक्टर असल्याचा फायदा घेत या व्यक्तीने अनेक मुलांवर बलात्कार केला आहे. ‘द एक्सप्रेस’ या न्यूज मासिकाने, हे देशातील बाल लैंगिक अत्याचारासंदर्भातील हे सर्वात मोठे प्रकरण (Biggest Paedophile Affair) असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: Child Sexual Abuse: 300 धर्मगुरूंनी केले एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण; चर्चसमोरील गंभीर समस्या)

14 वर्षांपूर्वीच या डॉक्टरवर अशा प्रकारचे आरोप झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला प्रॅक्टीस करण्याची परवानगी दिली होती. या काळात या डॉक्टरने 250 पेक्षा जास्त मुलाचे लैंगिक शोषण केले. त्याच्या या सर्व कृत्याची माहिती त्याच्या डायरीमधून मिळाली. पेशंटला भूल दिल्यानंतर त्यांच्यावरही या डॉक्टरने बलात्कार केले आहेत. तसेच अनेक केसेसमध्ये ऑपरेशन झाल्यावर त्या पेशंटवर बलात्कार केला गेला आहे. हे पाहता या व्यक्तीने पेशंट आणि डॉक्टर यांच्या नात्याला अक्षरशः काळिमा फासला आहे.