ऐकावे ते नवलच! दोन वर्षांपासून व्यक्तीच्या Penis मधून बाहेर पडत आहे Potty, तर गुदाशयातून निघत आहे मूत्र व वीर्य
For representational purposes only (Picture Courtesy: Pexels)

जगातील अनेक लोकांना अनेक विचित्र अशा वैद्यकीय समस्या असतात. काही लोकांच्या समस्या डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करतात. अलीकडेच, एक व्यक्ती आपली एक अशीच विचित्र समस्या घेऊन टेक्सासमधील (Texas) एका रुग्णालयात पोहोचली. त्याची समस्या अशी होती की ती पाहून डॉक्टरही बुचकळ्यात पडले. तर या व्यक्तीच्या गुप्तांगातून जिथून लघवी बाहेर पडते तिथून पॉटी म्हणजेच मल बाहेर पडत होता, तर जिथून मल निघतो म्हणजेच गुदद्वारातून मूत्र तसेच वीर्य बाहेर पडत होते.

या 33 वर्षीय व्यक्तीच्या पाच दिवस अंडकोषात वेदना झाल्यानंतर वैद्यकीय मदत घेण्यासाठी तो रुग्णालयात पोहोचला. त्यावेळी त्याच्या शरीराच्या रचनेमध्ये काही तरी बिघाड आढळला. गेल्या दोन वर्षांपासून, त्याच्या मूत्राशयातून गॅस व मल बाहेर पडत होते. त्याच्या गुदाशयातून लघवी आणि वीर्य निघत होते. तो कोणालाही आपली ही स्थिती सांगू शकत नव्हता. त्याला डॉक्टरांकडे जाण्याचीही लाज वाटत होती. परंतु दोन वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर आता त्याच्या अंडकोषात सूज आल्यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या व त्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले.

Cureus जर्नलमध्ये या व्यक्तीची केस स्टडी प्रकाशित करणाऱ्या टीमला रुग्णाच्या मूत्रमार्गात संक्रमण आढळले, तर डिजिटल रेक्टल टेस्टमध्ये त्याच्या रेक्टल वॉलमध्ये काही समस्या असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी हा माणूस ड्रग्जच्या अतिसेवनामुळे तीन आठवडे कोमात होता. त्या काळात, रुग्णालयात त्याला फॉले कॅथेटर लावण्यात आले जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीरातून मल व मूत्र बाहेर पडेल. यामुळेच रुग्णाच्या शरीराचे नुकसान झाले होते व तेव्हापासून त्याच्या शरीर रचनेत बदल झाला. (हेही वाचा: Sexual Frustration: नियमित Sex करूनही येत आहे 'सेक्शुअल फ्रस्ट्रेशन'?; लैंगिक निराशा कमी करण्यासाठी जाणून घ्या काही सोपे उपाय)

डॉक्टरांना त्याच्या शरीरात मूत्रमार्ग आणि गुदाशय दरम्यान Fistula आढळला. जिथून त्याचे मल व मूत्र एकत्र बाहेर पडत होते. आता शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत आहे. डॉक्टरांना आशा आहे की लवकरच तो सामान्य जीवन जगू लागेल.