
आजकाल सेक्शुअल फ्रस्ट्रेशन (Sexual Frustration) म्हणजेच लैंगिक निराशा ही गोष्ट फार कॉमनली पहायला मिळत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, लैंगिक निराशा तेव्हा येते जेव्हा आपण आपल्या लैंगिक जीवनाबाबत समाधानी नसता व त्यामुळे आपल्याला आतून सतत बेचैन वाटत राहते. लैंगिक निराशा याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सेक्स मिळत नाही, याचा अर्थ म्हणजे तुम्हाला सेक्सदरम्यान जे मिळत आहे त्याबाबत तुम्ही संतुष्ट नाही किंवा तुम्हाला आणखी काही हवे आहे. अमेरिकन सेक्स थेरपिस्ट आणि सेक्सोलॉजिस्टच्या मते सेक्शुअल फ्रस्ट्रेशनकडे लक्ष देऊन त्याबाबत वेळेल काही उपाय करणे फार महत्वाचे आहे.
जर तुम्ही नियमितपणे सेक्स करत असाल आणि तरीही तुम्ही सेक्सबद्दल खूप विचार करत असाल तर तुम्ही लैंगिक नैराश्ये सामोरे जात असल्याची शक्यटा आहे. लैंगिक नैराश्येला पुरुष किंवा स्त्री कोणीही बळी पडू शकतो. जर तुम्ही देखील लैंगिक निराशेचा सामना करीत असाल तर त्यावर मात करण्याचे काही उपाय आम्ही सांगत आहोत. कदाचित त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
भावनिक जवळीक शोधा- सेक्स न करताही तुम्ही स्वतःचे सेक्शुअल फ्रस्ट्रेशन कमी करू शकता. त्यासाठी तुम्हाला भावनिक जवळीक साधने गरजेचे आहे. कोणतेही एक असे नाते तुम्हाला यातून बाहेर काढण्यास मदत करू शकते, जिथे शारीरिक संबंध नसून भावनिक जवळीक आहे. यासाठी एखादे प्लॅटोनिक नाते फायदेशीर ठरू शकते जिथे तुम्ही मनमोकळेपणाने बोलून मनातील गोष्टी बाहेर काढू शकता.
घाम गाळा- व्यायामाद्वारे तुम्ही तुमचे सेक्शुअल फ्रस्ट्रेशन कमी करू शकता. चालणे, धावणे, किंवा जिममधील व्यायाम हा शरीरातील नकारात्मक उर्जेला बाहेर काढण्यास मदत करतो. यामुळे तुम्हाला मनातून हलके वाटते.
तुमच्या जोडीदाराला दोष देऊ नका- सेक्शुअल फ्रस्ट्रेशन असले तरी यासाठी तुमच्या जोडीदाराकडे बोट दाखवू नका. लक्षात ठेवा हा कोणा एकट्याचा मुद्दा नसून दोघांमधील नात्याचा आहे. लोकांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. प्रत्येकाच्या सेक्सकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. त्यामुळे याबाबत आपल्या जोडीदारावर चिडण्याऐवजी त्याच्याशी बोलून, चर्चा करून तोडगा काढा. (हेही वाचा: Foods That Can Improve Your Sex Life: 'या' पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे लैंगिक जीवन सुधारू शकते)
स्वतःहून सेक्स सुरू करा- बऱ्याचदा स्त्रिया पुरुषांकडे सेक्स सुरू करण्याची जबाबदारी देऊन मोकळ्या होतात. प्रत्येकवेळी पुरुषांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. मात्र कधी कधी पुरुष जोडीदाराचीही तशीच अपेक्षा असू शकते. त्यामुळे समोरची व्यक्ती पुढाकार घेईल याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला सेक्स करायची इच्छा असेल तर तुम्ही पुढाकार घ्या.
सेक्स थेरपिस्ट आणि सेक्सोलॉजिस्टची मदत घ्या- जर तुम्हाला वाटत असेल की तुमची निराशा मानसिक आरोग्याच्या स्थितीमुळे निर्माण झाली आहे किंवा त्याचा तुमच्या जीवनातील इतर बाबींवर लक्षणीय परिणाम होत आहे, तर एखाच्या थेरपिस्ट किंवा समुपदेशकाला भेटणे फायद्याचे ठरू शकेल. अनेकवेळा आपल्या मनातील गुंता आपण सोडवू शकत नाही, अशावेळी बाहेरून मदत घेणे हा एक योग्य उपाय ठरू शकेल.
(टीप- या लेखात दिलेली माहिती फक्त माहितीच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. याकडे कोणत्याही रोगाचे उपचार किंवा वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी होतील असा आमचा दावा नाही, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)