अमेरिकेत महिलेचा गुप्तांगातून ड्रग्स तस्करीचा प्रयत्न; पोलिसांनी पकडलं
(Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

अमेरिकेत टेक्सास (Texas) भागात U.S. Customs and Border Protection च्या अधिकार्‍याला ड्र्ग्स लपवण्यासाठी एका महिलेने चक्क fentanyl pills योनिमार्गात लपवण्याचं आढळलं आहे. CBP officers च्या माहितीनुसार, 40 वर्षीय अमेरिकन रहिवासी महिलेने कंडोम मध्ये ड्रग्सच्या गोळ्या लपपून ते योनिमार्गात घालून तस्करी करत असल्याचं आढळले आहे. हे देखील नक्की वाचा: Texas School Shooting: 18 वर्षीय तरूणाकडून अमेरिकेत शाळेत गोळीबार; 18 विद्यार्थी ठार .

पोलिसांनी थोडं सतर्क होऊन पादचारी क्रॉसिंगवर पॅट-डाउन शोध सुरू केला तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. आरोपी महिलेने स्वतःहून fentanyl pills ने भरलेला कंडोम बाहेर काढला. हे देखील नक्की वाचा: Mumbai: गुप्तांगातून सोन्याची तस्करी करणाऱ्या 3 महिलांना मुंबई विमानतळावरून अटक .

वास्तविक गोळ्या योनीमध्ये बसण्यासाठी त्या कस्टम कंटेनरमध्ये होत्या आणि ते कंटेनर नंतर कंडोममध्ये गुंडाळले गेले होते. fentanyl च्या अंदाजे 0.006 पाऊंड्स ड्रग्स त्या महिलेजवळ आढळले आहे.

मेक्सिकोमधील सिउदाद जुआरेझच्या सीमेला लागून असलेल्या एल पासो येथील प्रवेश बंदरांवर गेल्या आठवड्यात झालेल्या 25 अटकांपैकी ही एक मोठी अटक आहे.