गुत्पांगातून सोन्याची तक्रारी (Gold Smuggling) केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ टर्मिनल 2 वरून (Chhatrapati Shivaji Maharaj Airport) काल (18 ऑगस्ट) केनियाच्या 3 महिलांना ताब्यात घेतले आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) ही कारवाई केली आहे. या महिलांकडून एकूण 937.78 ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सोन्याची तस्करी करण्यासाठी महिलांनी लढवलेली शक्कल पाहून अधिकारीदेखील चक्रावून गेले आहेत. यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 3 महिला बुधवारी मुंबईत आल्या होत्या. या महिलांवर संशय आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशीदरम्यान, महिलांनी जवळ सोने असल्याचे मान्य केले नाही. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले. दरम्यान, त्यांचे एक्सरे काढण्यात आल्यानंतर त्यांनी गुप्तांगातून सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले. हे देखील वाचा- मुंबई: मुलगा हवा असल्याने 8 वेळा गर्भपात करायला लावणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने दाखल केली तक्रार
एएनआयचे ट्वीट-
NCB Mumbai intercepted 3 Kenyan women at Chhatrapati Shivaji Maharaj Int'l Airport &seized 3 packets containing a total of 17 pieces of gold from their vaginal & rectal cavities. A total of 937.78 grams of gold recovered. Case handed over to Customs authorities for further probe. pic.twitter.com/p4YGdBxpnm
— ANI (@ANI) August 19, 2021
देशात सोन्यावर असलेल्या आयातकरामुळे तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी सोने तस्करीचे प्रमाण मोठे होते. त्या तुलनेत आता तस्करीचे प्रमाण कमी आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता या विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.