मनाविरुद्ध एक-दोनदा नव्हे तर तब्बल 8 वेळा गर्भपात करायला लावल्याने मुंबई (Mumbai) मधील एका महिलेने पती आणि सासरच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुलगा हवा असल्याने तब्बल 8 वेळा मनाविरुद्ध पतीने 8 वेळा गर्भपात करायला लावल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित महिला सेवानिवृत्त न्यायाधीशांची मुलगी आहे. तिचा पती आणि सासरची मंडळी वकीली पेशात आहे. तर नणंद डॉक्टर आहे. (मुंबई: धावत्या लोकलमधून 6 महिन्याच्या गर्भवती महिलेला नवऱ्याने ढकलले, गर्भपात करण्यासाठी होता दबाव)
महिलेने तक्रारीत म्हटले की, 2007 मध्ये आमचे लग्न झाले. लग्नाच्या काही वर्षानंतर मुलगा हवा या हट्टापायी पतीने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. 2009 मध्ये तिला मुलगी झाली. 2011 मध्ये ती पुन्हा प्रेग्नेंट राहिल्यानंतर पतीने तिला गर्भपात करण्यास सांगितले. त्याचबरोबर मला मुलं हवं असताना देखील ऑपरेशन करुन घेण्यास सांगितले. त्यानंतर लहानसहान गोष्टींवरुन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. (घृणास्पद! 15 वर्षांच्या मुलीवर वडील व आजोबांचा 5 महिने बलात्कार; गर्भवती राहिलेल्या मुलीस न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी)
इतकंच नाही तर गर्भ लिंग तपासणी देखील करण्यास सांगितले. तसंच 8 वेळा गर्भपात करायला लावला. वेगवेगळ्या मेडिकल प्रोसिजरसाठी तिला 1500 पेक्षा अधिक हार्मोनल आणि स्टिरॉईड इंजेक्शन घेण्यास भाग पाडले. दरम्यान, या सर्व टेस्ट आणि ट्रिटमेंटसना भारतात बॅन आहे.
घरगुती अत्याचार आणि खाजगी प्रश्न असल्याने याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही तसंच पीडित महिलेची किंवा आरोपीची माहिती देखील उघड करु शकणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हुंडा, अत्याचार, गर्भनिदान चाचणी या गुन्हांविरुद्ध दादर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.