तामिळनाडूतील तंजावूर (Thanjavur) जिल्ह्यातून एक अत्यंत घृणास्पद आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका 15 वर्षाच्या मुलीवर चक्क तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी बलात्कार (Rape) केला आहे. यामुळे ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. जेव्हा हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) पोहोचले, तेव्हा मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता, न्यायालयाने 25 आठवड्यांनंतरही मुलीला गर्भपात (Abortion) करण्यास परवानगी दिली आहे. या मुलीच्या मावशीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी चालली होती, त्यावेळी मुलगी गर्भवती होऊन 25 आठवडे उलटूनही न्यायालयाने तिला गर्भपाताची परवानगी दिली.
यासंदर्भात मुलीच्या मावशीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, मुलीचे आरोग्य आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी देण्यात यावी. यापूर्वी, कोर्टाने तंजावर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डीनला असे मुलीचा गर्भपाता होऊ शकतो का? आणि गर्भ तसाच ठेवला तर, तिच्या आरोग्यास हानी पोहचू शकते का? हे शोधण्यासाठी वैद्यकीय समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यातून समोर आलेल्या निर्णयावर कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. (हेही वाचा: औरंगाबाद येथे 20 वर्षीय मुलाकडून आईवर वारंवार बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार)
कोर्टाने, मेडिकल कॉलेजच्या डीनला या मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देणारा, आदेश जारी केला. कोर्टाच्या आदेशात असेही नमूद केले आहे की, वैद्यकीय समितीचे सदस्य असलेल्या डॉक्टरांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया केली जाईल. दरम्यान, याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, मुलगी 4 वर्षांची सतना तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांनी आणि आजोबांनी तिच्यावर बलात्कार केला. जवळजवळ 5 महिने या मुलीचा शारीरिक छळ चालू होता. या संदर्भात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.