Terrorist Attack on Kabul Gurdwara: इस्लामिक स्टेट (IS) च्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारा (Gurdwara) मध्ये गोळीबार केला. यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय 7 ते 8 लोक अजूनही गुरुद्वारात अडकले आहेत. काबूलमधील कार्ट-ए-परवान गुरुद्वारामध्ये हा गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून अडकलेल्या दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे.
भाजपच्या निलंबित नेत्याने पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर अशा हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताच्या मीडिया विंगने एक व्हिडिओ जारी करून धमकी दिली होती. 2020 मध्ये गुरुद्वारा हल्ल्याची पुनरावृत्ती होईल असे त्यात म्हटले आहे. (हेही वाचा - Afghanistan: तालिबानच्या राजवटीमध्ये लोकप्रिय टीव्ही अँकरवर आली स्ट्रीट फूड विकण्याची वेळ (See Photos))
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास कार्ते परवान भागात स्फोट ऐकला. दुसरा स्फोट अर्ध्या तासानंतर झाला. स्फोटामुळे आकाशात धुराचे लोट पसरले. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे.
Explosions heard in Karte Parwan area of Kabul city. Details about the nature and casualties of this incident are not yet known: Afghanistan's TOLOnews
— ANI (@ANI) June 18, 2022
2020 मध्ये गुरुद्वारा हल्ल्यात 27 शीखांचा मृत्यू -
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने काबूलवर ताबा घेतल्यापासून शीख समुदाय दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांना असुरक्षित बनला आहे. भारताने कार्ट-ए-परवान शिखांना बाहेर काढण्यासाठी पाठिंबा दिला होता. सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मार्च 2020 मध्ये, काबूलच्या शॉर्ट बाजार भागातील श्री गुरु हर राय साहिब गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात 27 शीख ठार झाले होते. तर अनेक जण जखमी झाले होते.