File photo for representation only

Syria Drone Attack: सेंट्रल कमांड (CENTCOM) चे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी (John Rigsbee) यांनी शुक्रवारी असे म्हटले की, उत्तर पश्चिमेतील सीरियात अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अलकायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हामिद अल-मातर (Abdul Hamid Al-Matar) याचा मृत्यू झाला आहे. रिग्सवी यांनी असे ही म्हटले की, अमेरिकेने या हवाई हल्ल्यासाठी एमक्यू-9 विमानाचा सुद्धा वापर केला होता. मात्र अद्याप कोणताही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रिग्सबी यांनी आपल्या विधानात असे म्हटले की, अमेरिका आणि त्यांच्या भागीदारांसाठी अलकायदापासून सातत्याने धोका असायचा. अल-कायदा बाहेरील मित्र राष्ट्रांशी समन्वय साधण्यासाठी आणि बाह्य ऑपरेशन्सचे नियोजन करण्यासाठी सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करायचा. अलकायदा सीरियाला सीरिया, इराक आणि त्याच्यापुढील धोक्यांसाठी एका आधाराच्या रुपात उपयोग करतो.(पाकिस्तान येत्या एप्रिल 2022 पर्यंत FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये राहणार)

Tweet:

दरम्यान, याआधी सुद्धा गेल्या 20 सप्टेंबरला अमेरिकेने सीरियाच्या इदलिब शहरात आणखी एक हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये अलकायदा नेता सलीम अबू अहमद हा ठार मारला गेला होता. सलीम अलकायद्यासाठी प्लॅन आणि फंडिंग करण्याची व्यवस्था करत असे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी दक्षिण सीरियात अमेरिकेच्या चौकीवर हल्ला सुद्धा केला होता. परंतु रिग्सबी यांनी अमेरिकेने आता केलेला हल्ला हा त्या कार्यवाहीचे उत्तर आहे की नाही हे स्पष्ट केलेले नाही.