पाकिस्तान येत्या एप्रिल 2022 पर्यंत FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये राहणार
Pakistan Prime Minister Imran Khan (Photo Credits: IANS/File)

पाकिस्तान संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पॅरिसमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर फायनान्सशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने असे म्हटले की, पाकिस्तान येत्या एप्रिल 2022 पर्यंत ग्रे लिस्टमध्येच राहणार आहे. पाकिस्तानला पहिल्यांदा जून 2018 मध्ये ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. परंतु या लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न सुद्धा केले पण ते फोल ठरले. दरम्यान, दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक मदत आणि मनी लॉन्ड्रिंगवर नियंत्रण मिळवण्यास अयशस्वी झाल्याच्या कारणास्तव पाकिस्तानला या लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.

दरम्यान, ऑक्टोंबर 2019 पर्यंत पाकिस्तानकडून त्यांच्याकडे सुरु असलेल्या चुकीच्या गोष्टींवर कारवाई केली गेली नाही. त्याचसोबत लष्कर-ए-तैयबाचा सुत्रधार हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा सुत्रधार मसूद अजहर याचे सुद्धा दहशतवादी संघटनेच्या विरोधात तपास करणे आणि कारवाई करण्याच्या संदर्भात नाव आहे.(Afghanistan: तालिबानने केला महिला व्हॉलिबॉल संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद; सोशल मिडियावर व्हायरल झाले रक्तबंबाळ धडाचे फोटो)

FATF च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानला ठेवण्याचा निर्णय हा कोणत्या राजकीय आधारावर नव्हे तर तंत्रिक स्वरुपात घेण्यात आला आहे. तर पाकिस्तानची सध्या परिस्थिती अत्यंत डबघाईला गेल्याची झाली आहे. जून 2021 मध्ये एफएटीएफकडून पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानने 3-4 महिन्यांमध्ये चुकीच्या गोष्टींवर लगाम लावणार असल्याचे म्हटले होते.

नुकत्याच अमेरिकेने Terrorist and Other Militant Groups in Pakistan नावाचा रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते की, कमीतकमी 12 दहशतवादी संघटना आहेत ज्या अमेरिकेने परदेशाच्या संघटनांच्या आधारावर चिन्हित करण्यात आले असून त्या सर्व पाकिस्तानमध्ये स्थित आहेत. अमेरिकेच्या मते पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला पाठिंबा देत आह.

ग्रे लिस्ट मध्ये आल्याने पाकिस्तानच्या अडचणींत अधिक वाढ झाली आहे. पाकिस्तान आधीच IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आता ग्रे लिस्टमध्ये आल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मोठे संकट कोसळले आहे.