सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अशा कठीण प्रसंगामध्ये एकजुटीचा संदेश देण्यासाठी स्वित्झर्लंड येथील Matterhorn mountain वर नुकतीच भारताच्या तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. The Embassy of India to Switzerland च्या ट्वीटर अकाऊंटवरून रोषणाईचं विहंगम दृश्य शेअर करण्यात आलं आहे. दरम्यान हा फोटो रिट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटावर माणुसकीचा धर्म लवकरच मात करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे जगात मंदी पण Indian Economy मात्र सुरक्षित - संयुक्त राष्ट्र.
Zermatt Matterhorn ची फेसबूक पोस्ट
शुक्रवार, 17 एप्रिल च्या रात्री सुमारे 14,690 फीट उंच पर्वतांवर प्रसिद्ध Swiss light artist Gerry Hofstetter यांनी ही रोषाणाई केली होती. त्यानंतर गुरलीन कौर या भारतीय अधिकार्यांनी 'Friendship from Himalayas to Alps. Thank You'म्हणत हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान मागील आठवड्याभरापासून भारतासोबतच या पर्वतरांगांवर जपान, जर्मनी, युके, फान्स, इटली, अमेरिका सह अनेक देशांच्या झेंड्यांची रोषणाई केली होती.
Zermatt Matterhorn या टुरिझमला चालना देणार्या वेबसाईटकडून भारताच्या तिरंग्याची रोषणाई फेसबूक पेजवरदेखील शेअर करण्यात आली होती. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसर्या स्थानावरील देश आहे. सोबतच देशात अनेक भागांत लोकं दाटीवाटीनं राहत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान देशासमोर आहे. दरम्यान 'अशा परिस्थितीमध्ये एकतेची भावना जपत या महामारीवर मात करण्याची शक्ती मिळावी' अशा आशयाच फेसबूक पोस्ट लिहण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांचं ट्वीट
The world is fighting COVID-19 together.
Humanity will surely overcome this pandemic. https://t.co/7Kgwp1TU6A
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2020
आज आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात 14,378 कोरोना बाधित आहेत. तर 480 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11,906 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर गेल्या 24 तासांत 991 नव्या रुग्णांची भर पडली असून 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.