जगातील प्रतिष्ठित विद्यापीठ University of St Andrews लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात; 20 हून अधिक विद्यार्थिनींनी केले बलात्काराचे आरोप  
St Andrews University (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असणारे स्कॉटलंड (Scotland) चे University of St Andrews लैंगिक शोषणाच्या (Sexual Assault) आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. डझनभर मुलींनी त्यांच्यावर चक्क विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बलात्कार (Rape) केल्याचे सांगत, सोशल मीडियावर याबाबत भाष्य केले आहे. अशा अनुभवांसाठी इन्स्टाग्रामवर 'सेंट अँड्र्यूज सर्वाइव्हर' (St Andrews Survivors) नावाचे एक पेज तयार केले गेले आहे, जिथे बर्‍याच विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख लपवून आपली कहाणी मांडली आहे. आतापर्यंत 20 हून अधिक मुलींनी त्यांचे कटू अनुभव शेअर केले आहेत. या मुलींनी आपल्यावर बलात्कार, प्राणघातक हल्ला, जबरदस्ती आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

इंस्टाग्रामवर हे पेज तयार करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क केला जात असल्याचे, विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून त्या व्यक्तीशी संपर्क साधला जात आहे. या विद्यार्थिनींची मदत आणि त्यांचे समोपदेशन करण्यासाठी प्रशासनही पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरू केला आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील सत्रापासून अनिवार्य कार्यक्रमही सुरू करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना अशा घटना कशा टाळता येतील याबद्दल सांगितले जाईल. या व्यतिरिक्त ते अशा गोष्टींविरुद्ध कुठे आवाज उठवू शकतात हे देखील सांगण्यात येईल. सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे प्रशासनाने सांगितले. (हेही वाचा: मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीला अटक

विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपांमध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांच्या कुख्यात गटाचे नाव पुढे येत आहे. 'अल्फा एप्सिलन पाय' (Alpha Epsilon Pi) नावाच्या या गटाच्या विद्यार्थ्यांवर यापूर्वीही आरोप केले गेले होते. अमेरिकेत ही संघटना बर्‍यापैकी बदनाम आहे. मात्र, यासंदर्भात त्यांचे काही देणे-घेणे नसल्याचे सांगत या गटाने एक निवेदन जारी केले आहे. दरम्यान, St Andrews ही जगातील तिसरी सर्वात मोठी यूनिव्हर्सिटी आहे. प्रिन्स विलियम आणि डचेसऑफ केंम्ब्रिज कॅथरीन देखील इथले विद्यार्थी )आहेत. उच्च शिक्षणाच्या बाबतीत स्कॉटलंडचे हे विद्यापीठ बहुतेक वेळा शीर्षस्थानी राहिले आहे.