Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात एका 42 वर्षीय प्राध्यपकाने दुसरीच्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यावेळी मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीला एका शाळेच्या वर्गात घेऊन जाऊन हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
हैद्राबाद पासून 295 किमी अंतरावर असलेल्या एका शाळेत मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडित मुलीच्या अंगावर गंभीर जखमा आणि रक्ताचे डाग लागलेले होते. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे डॉक्टरांना तिच्या घरातील मंडळींना सांगितले.
पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी प्रथम याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत घालून मुलीसोबत घडलेल्या घटनेची दखल घेत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला शाळेतून निलंबित करा अशी मागणी केली जात आहे.