जगभरात इस्टर संडेच्या (Easter Sunday) दिवशी प्रभू येशूच्या पुनर्जन्माचा आनंद साजरा होत असताना श्रीलंकेत (Srilanka) झालेल्या साखळी दहशतवादी हल्ल्याने ( Serial Terrorist Attack) सर्वत्र शोककळा पसरली आहे. श्रीलंकेतील तब्बल आठ ठिकाणी चर्च आणि हॉस्टेल्समध्ये दहशतवादी हल्ले झाल्यामुळे साधारण 200 हुन अधिकांना आपले प्राण गमवावे लागले असून सोबतच शेकडो लोक गंभीर जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील वाळू शिल्पकार व पद्मश्री विजेते सुदर्शन पटनाईक (Sudarsan Pattnaik) यांनी देखील आपल्या कलेतून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देत ओडिशा (Odisha) मधील पुरी (Puri) इथल्या समुद्रकिनारी एक वाळूचे शिल्प (Sand Art) साकारले आहे.
हे वाळू शिल्प साकारत असतानाचा एक व्हिडियो देखील सुदर्शन यांनी नुकताच ट्विट केला आहे. श्रीलंकेतील हल्ला हा अतिशय भयंकर असून त्याचा तीव्र निषेध आहे, आम्ही श्रीलंकेच्या सोबत आहोत अशा आशयाच्या ट्विटला नेटकाऱ्यानी चांगला प्रतिसाद देत सुदर्शन यांचं कौतुक केलं आहे.
सुदर्शन यांचा वाळू शिल्प साकारतानाचा व्हिडियो
"We Condemn Horrific attack" in #SriLanka #WeAreWithSrilanka ' My Sand art at Puri sea beach in Odisha . pic.twitter.com/U6I45P8ON5
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) April 22, 2019
या धक्कादायक घटनेचा विरोध करत श्रीलंकेतील रहिवाश्याना आधार देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. अनेक सेलेब्रिटी देखील सोशल मीडियावरून श्रद्धांजली देत आहेत. Sri Lanka Serial Blasts: श्रीलंका मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पॅरिस मधील Eiffel Tower वरील रोषणाई बंद (Video)
श्रीलंकेत तूर्तास तरी कर्फ्यू लागू केलेला असून सोशल मीडियावर देखील काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसली तरी तपासामध्ये सात जणांना अटक करण्यात आली आहे.