Sperm Donation: एलॉन मस्कचे वडील Errol Musk यांना त्यांचे शुक्राणू दान करण्याची ऑफर, जाणून घ्या सविस्तर
Errol Musk (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे मालक एलॉन मस्कचे (Elon Musk) वडील एरोल मस्क (Errol Musk) गेले काही दिवस चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी 76 वर्षीय एरोल मस्क यांनी एक धक्कादायक खुलासा करत सांगितले होते की, त्यांचे 35 वर्षीय सावत्र मुलीसोबत लैंगिक संबंध आहेत आणि या शारीरिक संबंधांमुळे त्यांच्या सावत्र मुलीने त्यांच्या दोन मुलांना जन्म दिला आहे. आता द सनच्या वृत्तानुसार, एरोल मस्क यांनी दावा केला आहे की, त्यांना एलोन मस्कची नवीन पिढी तयार करण्यासाठी शुक्राणू (Sperm) दान करण्याची ऑफर मिळाली आहे.

एरोल मस्क म्हणाले की, त्यांना कोलंबियन कंपनीकडून स्पर्म डोनेट करण्याची ही ऑफर मिळाली आहे. उच्च श्रेणीतील कोलंबियन महिलांनी गर्भधारणा करण्यासाठी एरोल मस्क यांनी शुक्राणू दान करावे अशी कंपनीची इच्छा आहे. एरोल मस्क असेही म्हणाले की, त्यांना कंपनीकडून सांगण्यात आले होते की, ‘एलॉन मस्कची निर्मिती करणारी व्यक्ती आपल्यासोबत असताना स्पर्मसाठी एलोन मस्ककडे जाण्याची गरज नाही.’

एरोल मस्क पुढे म्हणाले की, त्यांना त्यांच्या या सेवेसाठी कोणतेही पैसे देण्याचे आश्वासन दिले गेले नाही. पण जर त्यांनी शुक्राणू दान करण्याची तयारी दर्शवली तर कदाचित त्यांना अनेक सुविधा दिल्या जातील. एलॉन मस्कच्या वडिलांनी म्हटले आहे की, शुक्राणू दान करण्यासाठी त्यांना प्रथम श्रेणी प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा अशा ऑफर्स दिल्या होत्या. (हेही वाचा: Elon Musk threat to Parag Agrawal: एलॉन मस्क यांची ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना धमकी)

दरम्यान, न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, एरोल मस्कने एका ब्रिटिश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले आहे की, त्यांचे सावत्र मुलगी जनासोबत शारीरिक संबंध आहेत आणि 2019 मध्ये जनाने त्यांच्या दुसऱ्या मुलाला, एका मुलीला जन्म दिला. एरोल मस्कच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आणि जनाच्या पहिल्या मुलाचा जन्म 2017 मध्ये झाला होता.