Elon Musk (credit- ANI)

टेस्लाचे (Tesla) सीईओ (CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी  ट्विटरमध्ये (Twitter)  गुंतवणूक केल्यानंतर एप्रिल (April) महिन्यात खुद्द ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट (Micro Blogging Site) ट्विटर  कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. ट्विटर विकत घेण्यासाठी मस्क आणि ट्वीटरमध्ये 44 अब्ज डॉलरचा करार केला केला गेला. पण गेल्या आठवड्यात अचानक ट्विटर (Twitter) विकत घेण्याचा करार एलॉन मस्क यांनी रद्द केला. मस्क यांच्या घोषणेमुळे ट्विटरचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले असुन आता ट्विटर बोर्डाचे चेअरमन ब्रेट टायलो यांनी मस्क यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

 

मस्क विरुध्द ट्विटर या खटल्यात ट्विटरच्या बाजून कोर्टात एक विशेष बाब मांडण्यात आली आहे.  रिपोर्टनुसार 28 जून रोजी एलॉन मस्क यांनी ट्वाटरचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांना धमकी देणारा मेसेज (Message) पाठवला. याप्रकरणात दररोज नवनवीन बाबी समोर येत आहे. ट्विटर आणि मस्क यांच्यात झालेल्या करारानुसार  हा करार रद्द झाल्यास  मस्क यांना 1 अब्ज डॉलर ब्रेक-अप रक्कम (Break Up Amount) ट्विटरला द्यावी लागले.  पण आता एलॉन मस्क यांना फक्त ब्रेक अप रक्कम देऊन चालणार नाही तर करारातील  काही अटी अशा होत्या ज्यानुसार मस्क यांच्यावर ठरलेला करार पूर्ण करण्याची सक्ती केली जाऊ शकते. याचा अर्थ आता मस्क आणि ट्विटर यांच्यातील कायदेशीर लढाई लांब काळ चालणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. (हे ही वाचा:-Sri Lanka : राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळण्यासाठी प्रवासाची सुविधा भारताकडून पुरवण्यात आलेली नाही : श्रीलंका भारतीय उच्चायुक्तालय)

 

एलॉन मस्क मागील काही काळापासून सतत ट्विटरचे शेअर्स (Shares) खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट  ट्विटर विकत घेण्याची ऑफर (Offer) दिली. एलॉन मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर दराने ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण गेल्या आठवड्यात मस्क यांचा अचानक ट्वीटर विकत न घेण्याचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे. एलॉन मस्क विरुध्द ट्वीटर या खटल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.