जगभरात कोरोना व्हायरस हा विषाणू झपाट्याने पसरत चालला असून अमेरिका, स्पेन (Spain) सारख्या शहरात कोरोना बाधितांची संख्या लाखांच्या पोहोचली आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, स्पेनमध्ये 551 नव्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून या देशात आतापर्यंत एकूण 19,000 रुग्ण दगावले आहेत. हा आकडा खूपच धक्कादायक असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या देशात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. स्पेनमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 1,82,000 च्या वर जाऊन पोहोचली आहे.
तर अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आता पर्यंत 25 हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. तर जगभरात 1,19,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांचा विचार केला तर कोरोना बाधितांच्या सर्वाधिक संख्येच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ स्पेन, इटली असे देश आहे. स्पेन: Lockdown च्या नियमांचे उल्लंघन करत एका महिलेने नग्न अवस्थेत पोलिसांच्या गाडीवर घातला धिंगाणा
Spain sees 551 new Coronavirus deaths as toll passes 19,000, reports AFP
— ANI (@ANI) April 16, 2020
जगभरात एकूण 19,54,724 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 1,26,140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून भविष्यातील ही स्थिती आणखीन गंभीर बनण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.