दाऊद इब्राहिम आणि सलाउद्दीन यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवावे-सूत्र
दाऊद इब्राहिम (Photo Credits-Twitter)

पाकिस्तान (Pakistan) देश जर दहशतवादापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि सैयद सलाउद्दीन (Sayeed Salahudeen) सारख्या अन्य दहशतवाद्यांना भारताच्या (India) हवाली करण्यात यावे. जे भारताचे नागरिक असून पाकिस्तानमध्ये राहत आहेत. सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी असे बोलण्यात आले की, त्यांनी पुलवामा भ्याड हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तान जैश-ए-मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास अयशस्वी झाला आहे.

सूत्रांनी असे सांगितले की, पाकिस्तानला वास्तवात असा संदेश द्यायचा आहे ज्यामध्ये दहशतवादी मुद्द्यावरुन भारताच्या चिंतेचे कारणाचे समाधान करायचे आहे. त्यामुळेच पाकिस्तानने दाऊद, सलाउद्दीन आणि अन्य दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे.(हेही वाचा-जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय)

पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटनेतील काही दहशतवाद्यांना अटक करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र दिखाव्यामुळे काहीच होणार नसून प्रत्यक्ष याबद्दल ठोस पावले उचलावी.