New York मध्ये JFK Airport वर भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला मारहाण करत पगडी फेकल्याचा प्रकार आला समोर; व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अमेरिकेकडून निषेध
Sikh Taxi Driver Assaulted in New York. (Photo Credits: Twitter Video Grab)

अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा वंशवादामधून अजून एका भारतीयाला हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा एक शीख टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याला मारहाण झाली असून पगडी फेकल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. त्याचा व्हीडीओ देखील सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. ही घटना न्यूयॉर्क मध्ये JFK International Airport वर झाली आहे.

दरम्यान ही घटना नेमकी कधीची आहे हे ठाऊक नाही पण 26 सेकंदाचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. ट्वीटर वर Navjot Pal Kaur या युजरने 4 जानेवारीला ट्वीटर वर शेअर केला आहे. भारतीय टॅक्सि ड्रायव्हारला मारहाण करण्यासोबत काही अपशब्द वापरल्याचेही ऐकायला येत आहे. अमेरिकेकडून हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याची दखल घेत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ

अमेरिकेचा निषेध

शीख टॅक्सी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एकदा शीख समुदायाकडून या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात आला आहे. The National Sikh Campaign कडून आपण नव्या वर्षात येऊन काही दिवस झाले आहेत आणि पुन्हा असा एक प्रकार समोर आला आहे. एक अज्ञात व्यक्ती शीख समुदायाच्या व्यक्तीच्या पगडीला हात लावत आहे. Foreign Education: उच्च शिक्षणासाठी 67% भारतीय निवडतात 'हा' देश- रिपोर्ट .

शीख व्यक्तीवर हात उचलल्याचा हा पहिलाच प्रकार नव्हे. यापूर्वी 2019 मध्येही अमेरिकेच्या वॉशिंग्टन मध्ये शीख उबर टॅक्सी ड्रायव्हरला वंशवादावरून टीपण्णीला सामोरं जावं लागलं होतं. 2017 मध्ये 25 वर्षीय शीख कॅब ड्रायव्हरला न्यूयॉर्कमध्ये मद्यप्राशन केलेल्या एका व्यक्तीने अशाच प्रकारे मारत पगडीला हात लावला होता.