धक्कादायक! विमानात चित्रपटाचं चित्रिकरण करायचं सांगून केलं पॉर्न फिल्मचं शूटिंग
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल फोटो)

ब्रिटनमधील मिडलँड म्युझियमधील (Midland Museum) विमानात पॉर्न फिल्म (Porn Movie) तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टाफला धोका देऊन काही अभिनेत्रींनी हे कृत्य केलं आहे. या अभिनेत्रींनी म्युझियममधील विमानात चित्रपटाचं शूटिंग करायचं आहे असं सांगून दिवसाचं 9000 रुपये भाडंही दिलं आहे. या अभिनेत्रींनी पॉर्न फिल्म शूट करत असल्याची पूर्वकल्पना म्युझियमधील स्टाफला दिली नव्हती. त्यामुळे म्युझियम परिसरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा - रानू मंडल हिचे गोल्डन रंगाच्या मेकअप मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल, सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून खिल्ली)

मिडलँड म्युझियम पाहण्यासाठी दररोज लहान मुलं, वयोवृद्ध, परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं आहे. 'द सन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या विमानात अडल्ट चित्रपट शूट केला जात होता ते विमान एकेकाळी फ्रान्सचं होतं, अशी माहितीही यात देण्यात आली आहे. दरम्यान, आमच्या डोळ्यात धुळफेक करण्यात आली आहे. खोटं बोलून हे कृत्य करण्यात आल्याचं म्युझियममधील स्टाफने सांगितलं आहे. या विमानात अडल्ट फिल्म चित्रित केली जाणार आहे, याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती. या अभिनेत्रींनी फक्त Vickers Viscount विमानात 'स्विमवियर' चित्रपट शूट करण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं होतं, असंही म्युझियममधील एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

अडल्ट चित्रपटाचं शूटिंग केलं जाणार आहे, अशी पूर्व कल्पना दिली असती तरी आम्ही त्याला परवानगी दिली नसती. आम्हाला या गोष्टीची माहिती मिळाली असती तर आम्ही हे शूटिंग थांबलं असतं, असंही एका कर्मचाऱ्याने सांगितलं. या अडल्ट चित्रपटाच्या शूटिंगसाठी या अभिनेत्रींनी शूटिंगसाठी पायलटचे कपडे घातले होते. तर काही अभिनेत्री या एअरहॉस्टेसचे कपडे घातले होते. म्युझियममध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग सुरू असते. त्यामुळे आम्हाला याबद्दल शंका वाटली नाही, म्युझियमचे मॅनेजर डिआने जेम्स यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी या विमानात अडल्ट चित्रपटाचं शूटिंग करणाऱ्या अभिनेत्रींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.