रानू मंडल हिचे गोल्डन रंगाच्या मेकअप मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल, नेटकऱ्यांकडून खिल्ली
Ranu Mondal Makeup Pics Memes (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियात एका गाण्याच्या व्हिडिओतून प्रसिद्ध झालेली रानू मंडल (Ranu Mondal) हिचे आता बरेच फॅनफऑलोअर्स झाले आहेत. तर गायक हिमेश रेशमिया याच्या चित्रपटातील गाणे गाण्याची संधी सुद्धा रानू हिला मिळाली. त्यानंतर आता रानू हिचे सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तिने गोल्डन रंगाचा मेकअप केल्याचे दिसून येत असल्याने सोशल मीडियात नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र रानू हिचे मेकअप मधील फोटो काहींनी फोटोशॉप केले असल्याचे म्हटले आहे.

रानु हिचे मेकअप मधील फोटो पाहून तिच्या लूकमध्ये कधी बदल झाला आहे याबाबत बोलले जात आहे. त्यात तिने गोल्डन आणि सफेद रंगाचा लेहंगासह ट्रेडिशन लूक दिसून येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीचा रानू मोंडल हिचा लूक आणि आताचा लूक फारच बदल दिसून येत आहे. मात्र रानू हिच्यावर करण्यात आलेला हा मेकअप तिच्यावर जास्तच भारी पडल्याने तिची खिल्ली उडवली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ही रानू हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक लहान मुलगी तिला स्पर्श करुन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यावेळी तिने त्याबाबत राग व्यक्त केल्याचा प्रकार दिसून आला होता.(रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल रातोरात झाली स्टार, हिमेश रेशमिया सोबत गायले हे सुंदर गाणे, Watch video)

Tweet:

पहा कोणी केला होता रानू मंडलचा मेकअप

मात्र अद्याप रानू हिचे सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो खरे आहेत की फोटोशॉप केले आहेत हे स्पष्ट झाले नाही. मात्र रानू हिची चांगलीच खिल्ली सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून उडवली जात आहे. यावर रानू हिने या फोटोबाबत काही विधान केले नसले तरीही ते अधिकच व्हायरल होत आहेत.