Ranu Mandal and Himesh Reshmiya (Photo Credits: Instagram)

ती रेल्वे स्टेशनवर गायली काय, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला काय अन् रातोरात स्टार झाली काय... थक्क करुन टाकेल असा हा रानू मंडलचा (Ranu Mandal) विलक्षण प्रवास. काही दिवसांपूर्वी एका रेल्वेस्थानकात गानसम्राज्ञी लता मंगशेकर (Lata Mangeshkar) हिच्या आवाजातील 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गायलेली रानू आता चक्क प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियासोबत (Himesh Reshammiya) गाताना दिसणार आहे. नुकताच या दोघांचा गातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून तो व्हायरलही होत आहे. थोडक्यात रानू ची गायन क्षेत्राकडे यशस्वी घोडदौड सुरु झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

मिडियाला मिळालेल्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने रानू ला आपल्या आगामी चित्रपट 'हार्डी अँड हीर' (Happy Hardy and Heer) मध्ये गाणे गाण्याची ऑफर केली. या गाण्याचे बोल आहेत 'तेरी मेरी कहानी.'

इतकच नव्हे या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताच सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. यासोबतच लवकर रानू मुंबईमध्ये हिमेश आणि अन्य परीक्षकांसोबत एका शो चा हिस्सा देखील बनणार आहे.

हेही वाचा- स्टेशनवर 'एक प्यार का नग़मा है' गाणाऱ्या रानू दीला मिळाली रिअ‍ॅलिटी शो ची ऑफर; मेकओव्हर झाल्यावर ओळखणे मुश्कील (Video)

रानूविषयी हिमेश रेशमिया म्हणाला की, "मी रानूजींना जेव्हा भेटलो तेव्हा मला जाणवले की त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे. त्यांचा आवाज खूपच सुरेल आहे. त्यामुळे मी माझ्याकडून त्यांच्यासाठी जितके करता येईल तितके करेन. त्यांच्याकडे देवाची देणगी आहे जी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे."

पश्चिम बंगालच्या (West Bengal)च्या राणाघाट रेल्वे स्टेशनावर रानूचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याने तिचे अख्ख आयुष्य बदलून गेले. इतकचं नव्हे तर तिच रुपडंही पालटलं.