Seven Indian nationals kidnapped in Libya released (Photo Credits-ANI)

Kidnapped Indian's Released from Libya: लिबिया येथे अपहरण झालेल्या 7 भारतीय नागरिकांची सूटका करण्यात आली आहे. यामधील बहुतांश जण हे आंध्र प्रदेश, बिहार आणि गुजरात येथील रहिवासी आहेत. या सर्वांचे 14 सप्टेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. हे सर्वजण मायदेशी परतण्यासाठी निघाले असता त्यांचे त्रिपोली विमानतळावर अपहरण केले गेले. लिबियात या सर्वांना कंस्ट्रक्शन आणि ऑइल सप्लाय करण्याऱ्या कंपन्यांमध्ये काम मिळाले होते. तर ट्यूनिशा मधील भारतातील राजदूत यांनी ही माहिती दिली. दरम्यान, लिबियात भारतातचे दूतवास नाही आहे. ट्युनिशा येथूनच भारतीय मिशन हेच लिबियात भारतीयांच्या देखरेखीचे काम करतात. गुरुवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या सात जणांचे अपहरण झाल्याची पुष्टी केली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी असे म्हटले होते की, या सर्व सात भारतीयांचे लिबियातील अशवरीफ नावाच्या ठिकाणाहून अपहरण झाले होते. तसेत या सर्वांना कंस्ट्रक्शन आणि ऑइल कंपनीत काम करत होते.अपहरण झालेल्या नागरिकांच्या सुरक्षित सुटकेबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. तर अद्याप भारतीयांचे कोणी अपहरण केले होते हे समजू शकलेले नाही असे ही श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.(Texas: महिलेने 19 वर्ष सामानाची चोरी करुन केली eBay वर विक्री, मिळाली $ 3.8 मिलियनचा दंड आणि तुरुंगाची शिक्षा)

दरम्यान, भारतीय परराष्ट् मंत्रालयाने 2015 मध्ये एक मार्गदर्शक सुचना जाहीर केली होती. त्यानुसार, भारतीयांनी लिबिया येथे जाण्यापासून बचाव केला पाहिजे. कारण तेथील सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती अनुकुल नाही आहे. त्यानंतर सरकारने सुरक्षिततेसंबंधित कारणास्तव लिबियाच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी अद्याप लागूच आहे.