Texas: महिलेने 19 वर्ष सामानाची चोरी करुन केली eBay वर विक्री, मिळाली $ 3.8 मिलियनचा दंड आणि तुरुंगाची शिक्षा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

टेक्सास मधील एका महिलेने अज्ञात ग्राहकांना 19 वर्षांपर्यंत चोरीच सामान विक्री केल्याचा प्रकार समोर आल्याने तिला 54 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. 63 वर्षीय किम रिचर्डसन 3.8 मिलियन डॉलरचा दंड भरण्यास आता तयार झाली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, डलास मधील 63 वर्षीय रिचर्डसन हिने 2000 आणि एप्रिल 2019 दरम्यान एका कॉन्सपरेन्सी मध्ये भाग घेतला होता. या वेळी संयुक्त राज्याचा प्रवास आणि काही दुकांनमधील सामान सुद्धा चोरी केले. फेडरल ब्युरो ऑफ इन्विस्टिगेशन अॅन्ड सिक्रेट सर्विस, युएस अटॉर्नी रयानच्या पॅट्रिक तर्फे करण्यात आलेल्या तपासात ही गोष्ट समोर आली आहे. त्यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा केली.

रिचर्डसन हिने वस्तू युएस मेल, फेडरल एक्सप्रेस आणि युनायटेड पार्सल सेवेच्या माध्यमातून विक्री केले होते. तसेच या वस्तूंसाठी $ 3.8 मिलियन मिळाले आणि विविध दुकानांच्या वेगवेगळ्या पेपाल (PayPal) अकाउंट्सच्या माध्यमातून पैसे भरले. प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, रिचर्डसन हिने ज्या लोकांना सामान विक्री केले त्यांची ओखळ पटवणे असंभव नाही आहे. रिचर्डसन हिला शिक्षा देण्याचा आदेश दिला गेला आहे. तिला तीन वर्ष तुरुंगांची शिक्षा दिल्यानंतर सोडून दिले जाणार आहे.(Real Dinosaur Cloned in China? Jurassic World च्या प्रदर्शनातील डायनॉसर सारख्या दिसणार्‍या प्राण्याचा हा Video पाहुन नेटकरी झाले थक्क)

न्यूज रिलिज मध्ये असे लिहिले आहे की, रिचर्डसनने काही रिटेल स्टोर्समधील सामान चोरी केले. त्यावेळी सिक्युरिटी डिवाइसेस निष्क्रिय करण्यासाठी शॉपलफ्टिंगच्या उपकरणांचा वापर करुन त्या चोरी केल्या. चोरी केलेल्या वस्तू तिने एका मोठ्या काळ्या बॅगेत स्टोर करुन बाहेर निघून जात. रिसचर्डसन याने इंटरनेटवर सामानांची विक्री करण्यास मदत केली. त्याचसोबत चोरी केलेल्या सामानाचे पॅकेजिंग आणि मेलिंग सुद्धा केले.

रिचर्डसनला डिसेंबर 2019 मध्ये दोषी पकडले गेले. जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेनुसार, तिला बॉन्डवर राहण्याची परवानगी दिली गेली होती. स्वेच्छाकडून अमेरिकेतील तुरुंग ब्युरो फॅसिलिटीला समर्पण केले होते. त्यानंतर कळले नाही की रिचर्डसनकडे कोणता वकिलच नव्हता.