रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine)मधील वादातून शांतता आणि संयम यामधून मार्ग काढण्याचं आवाहन केले जात होते पण आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याची चिन्हं आहे. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. यावेळी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असेही आवाहन केले आहे. तसेच संबोधित करताना रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. लष्करी कारवाईची घोषणा होताच Kyiv मध्ये काही स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.
युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. पुतिन यांनी नुकतेच युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केले आहे. हे आक्रमकतेचे युद्ध आहे. जग पुतीनला थांबवू शकते आणि थांबवावे. आता कृती करण्याची वेळ आली आहे. अशी भूमिका युक्रेन कडून मांडण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेकडूनही रशिया-युक्रेन वादावर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाने विनाशकारी मार्ग निवडल्याने आता विनाशकारी परिणाम भोगावे लागणार आहेत असे म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. रशिया-युक्रेन यांच्यामधील युद्धाचे परिणाम जगावर होणार आहेत. भारताने देखील विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनी युक्रेन सोडावे असं आवाहन केले आहे. नक्की वाचा: Ukraine Crisis: रशियाकडून Donetsk आणि Lugansk या बंडखोर प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा, अमेरिका खवळली; यूक्रेन संघर्ष वाढला.
#UkraineRussiaCrisis | (Post the announcement of a 'military operation' in Ukraine by Russian President Vladimir Putin), an explosion was heard in Kyiv; oil prices break $100 on Russian 'military operation' in Ukraine: AFP
— ANI (@ANI) February 24, 2022
युद्धाची घोषणा झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढत आहे. प्रति बॅरलची किंमत 100 डॉलरच्या वर गेले आहेत. सोन्याच्या किंमती देखील वाढल्या आहेत.
रशियन युनियन मधून 15 पेक्षा अधिक देश बाहेर पडले आहेत. त्यांनी नाटो मध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करण्यासाठी रशियाकडून हे दबावतंत्र वापरले जात आहे. सध्या युक्रेनला नाटोचं सदस्यत्त्व मिळू नये यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.