Ukraine Crisis: रशियाकडून  Donetsk आणि Lugansk या बंडखोर प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा, अमेरिका खवळली; यूक्रेन संघर्ष वाढला
Joe Biden, Vladimir Putin (PC - Facebook)

यूक्रेनसोबत (Ukraine Crisis) सुरु असलेल्या वादात रशियाचे (Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनच्या दोन बंडखोर आणि फुटीरवादी प्रदेशांना थेट स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आहे. त्यामुळे युक्रेनमधून Donetsk (डोनेस्तक) आणि Lugansk (लुगांस्क) असे दोन देश निर्माण झाले आहेत. अर्थात जगभरातील देशांची यास कशी संमती आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अमेरिकेने मात्र रशियाच्या या निर्णयास विरोध दर्शवला आहे. पश्चमी देशांनी या निर्णयावरुन रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही रशियाने हा निर्णय घेतलाच. त्यामुळे पश्चिमी देश आणि यूक्रेन व रशिया यांच्यातील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

  • रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दुरचित्रवाणीवरुन बोलताना सांगितले की, मला वाटते की, Donetsk आणि Lugansk यांच्याबाबत दीर्घकालीन स्वतंत्र निर्णय घेणे आवश्यक आहे. क्रेमलिनमध्ये बंडखोर नेत्यांसोबत परस्पर समझोत्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पूतीन यांनी असे म्हटले.
  • दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी रशीयाच्या या कृतीचा तीव्र निशेध केला आहे. त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती आणि जर्मनीच्या चान्सेलर यांच्याशी चर्चा केली. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी रशियाविरुद्ध संपूर्ण बंदी लावण्याचे जगभरातील राष्ट्रांना अवाहन केले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाठिंबाही मागितला आहे. (हेही वाचा, Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभुमीवर Vladimir Putin)
  • अमेरिकेचे राष्ट्राधयक्ष जो बाडयेन यांनी लुगांस्क, डोनेट्स्क यांच्याविरोधात बंधने घातली आहेत. रशिवयाविरोधात अद्याप मात्र कोणतीही बंधने घातली नाहीत.
  • जो बायडेन यांनी एका आदेशावर स्वाक्षरी करत म्हटले की, मी रशियाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्याही बचावाची संधी न देण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आम्ही एक पुढच्या पावलांवर यूक्रेनसह इतर सहयोगी देश आणि भागिदारांशी सातत्याने स्वाद करत आहोत.
  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैन्युएल मॅक्रोन यांनी रशियाकडून यूक्रेनच्या दोन बंडखोर गटांना स्वतंत्र मान्यता देण्याच्या निर्णयाचा निशेष केला आहे. यूरोपीय संघाने मॉस्कोवर नवे प्रतीबंध लावण्याचा आग्रह केला आहे.

यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेस्की यांनी म्हटले की, आता अराजकीय तत्वांविरोधात कारवाई न करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने उभे ठाकण्यासाठी सर्व काही करु. आम्ही शांततापूर्ण मार्गाने बोलणी पुढे ठेवण्याच्या विचारांचे आहोत. आम्ही याच मार्गावरुन पुढे जाऊ. आम्ही आमच्या भूभागावर आहोत. आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही कोणाचीही बाकी ठेवली नाही. आता आम्ही कोणाला काहीही देणार नाही.