2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमिया शहरावर हल्ला करून त्याचा कब्जा घेतला होता. त्यानंतर या दोन्ही देशातील संघर्ष सुरू होता. युक्रेनमधील डॉनबासचे दोन भाग लुहांस्क आणि डोनेत्स्क फुटीरतावाद्यांनी वेगळा देश घो केले. हे दोन्ही सध्या भिन्न देश आहेत. हे दोन्ही देश पूर्व युक्रेनचा भाग आहेत. 2021 च्या शेवटी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी NATO च्या सदस्यत्वाची घोषणा केली. या निर्णयानंतर रशिया युक्रेनवर नाराज असून, त्यांना युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये असे वाटते. युक्रेनवर दबाव आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लाखो रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत आणि रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असे मानले जात आहे.

सध्या युक्रेन आणि रशियामध्ये पूर्व युक्रेनला वेगळा देश म्हणून मान्यता देण्याबाबत संघर्ष जारी आहे. अशात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज देशाला संबोधितक करणार आहेत. पुतिन पूर्व युक्रेनला वेगळा देश म्हणून मान्यता देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनू शकते. तत्पूर्वी, सुरक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुतिन म्हणाले होते की, पूर्व युक्रेनला मान्यता देण्याचा विचार केला जात आहे. आता आजच्या भाषणात पुतीन काय बोलतात याबाबत सरावंना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

पुतीन यांचे हे भाषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)