Russia-Ukraine War: आतापर्यंत 18 हजार भारतीयांनी युक्रेन सोडल्याची पराराष्ट्र मंत्रालयाची माहिती
MEA Spokesperson Arindam Bagchi (Photo Credits-ANI)

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन मध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशातच भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यासाठी स्पेशल मिशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी असे म्हटले की, आतापर्यंत 18 हजार भारतीयांनी युक्रेन सोडला आहे. ऑपरेशन गंगानुसार भारतीयांना मायदेशात आणले जात असून त्याचा वेग वाढवला जात आहे. एका दिवसात 15 फ्लाइटच्या माध्यमातून 3 हजार भारतीयांना परत आणले आहे. गेल्या 24 तासात 30 फ्लाइट्सच्या माध्यमातून 6400 भारतीयांना पुन्हा मायदेशात आणले आहे. त्यांनी संकटादरम्यान मदतीसाठी युक्रेन आणि त्याच्या शेजारच्या देशांचे आभार मानले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता यांनी म्हटले की, उद्या 15 आणखी पुढील 24 तासात 18 फ्लाइट्स नियोजित करण्यात येणार आहेत. रोमानिया मध्ये एका नव्य स्थानी सुचिआवची ओळख केली गेली आहे. तेथून फ्लाइट्सच्या माध्यमातून भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न अधिक केला जाणार आहे. तसेच मंत्रालयाकडून अधिक उड्डाणांचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.(रशियाचे अध्यक्ष Vladimir Putin यांना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी बक्षीस जाहीर; मिळणार तब्बल 7.5 कोटी)

परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीकडून  भारतियांसाठी जेवण आणि राहण्याची सोय केली जात आहे. त्यांनी असे म्हटले की, पुढील 2-3 दिवसात आम्ही आणखी काही जणांना मायदेशात आणणार आहोत. प्रवक्त्यांनी असे म्हटले की, दुर्दैवाने युक्रेनमध्ये हिंसाचार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. भारत सरकार सातत्याने युक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहेत. त्यांनी म्हटले की, युक्रेनमध्ये अद्याप हजारो नागरिक आहेत. गाइडलाइन्स जाहीर झाल्यानंतर काही भारतीय खारकीव मध्ये आहेत. जे लोक खारकीव सोडू शकत नाहीत त्यांना अपील केले जात आहे की, त्यांनी ट्रेनच्या माध्यमातून तेथून निघावे.

त्यांनी असे ही म्हटले की, बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी खारकीव सोडले. ते जवळच्या पेसोचिन मध्ये आहेत. जवळजवळ 1 हजारांच्या संख्येने विद्यार्थी आहेत. अरिंदम बागची यांनी असे म्हटले की, सुरुवातीला 20 हजार भारतीय नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले होते. परंतु त्यात असे ही होते की, त्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते. आमचा असा अनुमान आहे की, काही शंभर नागरिक अद्याप ही खारकीवमध्ये आहेत. आमचे प्रमुख उद्देश हे विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत सुखरुप बाहेर काढणे.

दरम्यान, सुमीत काही विद्यार्थी असू शकतात. आम्ही संपर्कात असून सर्व मार्गांचा उपयोग करुन त्यांना तेथून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर युक्रेनमध्ये भारतीयांना बंदी केल्याच्या आरोपावर मंत्रालयाने असे म्हटले की, आम्हाला अशा घटनेची कोणतीही माहिती मिळालेली नाही. परराष्ट्र सचिवांनी युक्रेनच्या डिप्युटी परराष्ट्र सचिवांची बातचीत केली आहे.