
Russia-Ukraine Conflict: युक्रेन आणि रशियामध्ये दिवसागणिक वाद अधिक चिघळत चालला आहे. युक्रेनवर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. युक्रेनच्या महासंकटाच्या दरम्यान आतापर्यंत अमेरिका, भारतासह काही देशांनी आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचे निर्देशन दिले आहेत. तर आता जर्मनीच्या सरकारकडून सुद्धा नागरिकांना हिच सुचना दिली गेली आहे. तर सोमवार पासून युक्रेन येथून येणारी-जाणारी उड्डाणे आंशिक रुपात निलंबित केली जाणार आहेत.
रशिया-युक्रेन दरम्यान वाढत्या तणाव आणि संकटामुळे जर्मनच्या सरकारन तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी निर्देशन दिले गेले आहेत. समाचार एजेंसी सिन्हुआ यांच्या रिपोर्ट्सनुसार,
कोणत्याही वेळी लष्करी संघर्ष शक्य आहे, योग्य वेळी देश सोडा," जर्मन फेडरल परराष्ट्र कार्यालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सुरक्षा निर्देशात म्हटले आहे.(Russia-Ukraine Crisis: युक्रेनमधील विद्यार्थी मायदेशी परतणार, सुरक्षित परतीसाठी सरकारकडून चार्टर्ड उड्डाणे सुरू करण्यास प्रोत्साहन)
रशिया-युक्रेन युद्धाच्या संकटाच्या दरम्यान, जर्मनीची ध्वजवाहक आणि सर्वात मोठी विमान कंपनी लुफ्थांसाने घोषणा केली आहे की ते फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत कीव आणि ओडेसाला जाणारी त्यांची नियमित उड्डाणे स्थगित करणार आहेत. अशा परिस्थितीत तेथे राहणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे.(Ukraine Crisis: भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूतावासाकडून युक्रेन सोडण्याचा सल्ला)
आम्ही तुम्हाला सांगतो की ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे त्यांना प्रवास पर्याय देण्यासाठी काही फ्लाइट आता शनिवार आणि रविवारी चालतील. एअरलाइन लुफ्थान्साने सांगितले की, बाधित झालेल्यांना माहिती दिली जाईल आणि पर्यायी फ्लाइटसाठी पुन्हा बुकिंग केले जाईल.