कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी लस (Coronavirus Vaccine) बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत:च ही माहिती दिली. रशियात बनलेली कोरोना व्हायरस लस पहिल्यांदा आपल्या मुलीला देण्यात आल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे. ही लस घेतल्यानंतर कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते, असे रशियाने म्हटले आहे. एएफपी नावाच्या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपति व्हादिमीर पुतिन यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्हटले की, कोरोना व्हायरस लसीचा पहिला डोस आज सकाळी देण्यात आला. पुढे बोलताना पुतिन यांनी म्हटले की, त्यांच्या मुलीसाठीही या लसीचा वापर करण्यात आला. (हेही वाचा, COVID-19 Vaccine: पुण्याच्या Serum Institute of India चा Bill And Melinda Gates Foundation व Gaviसोबत करार; 2021 पर्यंत 100 मिलियन डोस उपलब्ध करण्याचं लक्ष्य)
#BREAKING Russia has developed 'first' coronavirus vaccine: Putin pic.twitter.com/s33LTMO0j0
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अवघे जग झुंजत आहे. जगभरातील अनेक वैज्ञानिक, आरोग्य विभागात काम करणारे तज्ज्ञ आणि एकूणच विज्ञान कोरोना व्हायरस नियंत्रणाचा उपाय, उपचार आणि औषध शोधत आहेत. कोरोनावर लस मिळवल्याचे अनेक दावे झाले. मात्र, अद्याप तरी कोणत्याही देशाच्या दाव्यात तथ्य आढळून आले नाही.
#BREAKING Putin says daughter inoculated with new Russian coronavirus vaccine pic.twitter.com/tGA9E81BmU
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस निर्मिती केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या दाव्यात तथ्य आढळून आले तर मानवी इतिहासातील हे एक मोठे यश मानले जाईल. इतकेच नव्हे तर अवघे जगही सूटकेचा निश्वास सोडेल. जगभरातील देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतही या प्रयत्नता मागे नाही. भारतातही कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे.