Russia Banned: रशिया ऑलिम्पिकसह कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही- WADA
Russia-faces-4-Year-Olympic-Ban (Photo Credit: Getty Images)

वर्ल्ड ऍन्टी डोपिंग एजेन्सीने (World Anti-Doping Agency) रशियाला (Russia) डोपिंगच्या कारणास्तव 4 वर्षाची बंदी घातली आहे. वाडाने लावेलेल्या बंदीनंतर रशिया कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. वाडाने सोमवारी एकमताने रशियावर बंदी घातली आहे. यामुळेपुढील वर्षात जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून रशिया मुकावे लागणार आहे. एवढेच नव्हेतर, 2022 साली कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेतही रशियाला भाग घेता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर रशिया विन्टर आणि पॅरालिम्पिकचा भाग राहणार नाही. स्विझरलॅन्ड येथील लुसानेमध्ये वाडाच्या 12 सदस्यांची कार्यकारी समितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियातील ऍन्टी डोपिंग एजेन्सी प्रमुख यूरी गानस यांनी याबाबत माहिती दिली.

वाडाने लावलेल्या बंदीनुसार रशियातील ऍथेलिट्स यामध्ये आरोपी नाहीत, ते सर्वजण न्यूट्रल खेळाडू जागतिक स्पर्धेत खेळू शकणार. डोपिंगबाबत चुकीची आकडेवारी मिळाल्यानंतर वडा यांनी रशियाविरूद्ध ही कारवाई केली. वाडा म्हणाले, डोप टेस्टसाठी चुकीचे नमुने पाठविल्याचा आरोप होता. तपासणी दरम्यान, रशियाने नमुन्यांसह छेडछाड केली हे स्पष्ट झाले. हे देखील वाचा-मौरीटानियाच्या किनाऱ्यावर स्थलांतरितांची बोट धडकून 58 जण ठार

तसेच, वड्याला रशियन खेळाडूंचा चुकीचा डोपिंग अहवाल पाठविण्यात आला होता आणि यात रशियाच्या सरकारी क्रीडा समित्यांची संमती होती. या चुकीच्या अहवालाच्या बातमीनंतर २०१४ मधील रशियाच्या ऑलिम्पिक कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.