आफ्रिका खंडातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ मौरिटेनिया या वायव्येकडील देशात बोटीचा भीषण अपघात (Boat Capsizes) झाला आहे. मौरिटेनियन (Mauritania) किनाऱ्यावर बोट धडकून 58 स्थलांतरित ठार झाले आहेत. हे स्थलांतरीत लोक बोटीतून युरोपला जात होते. यातील सर्वजण पश्चिम ऑफ्रिकेतील गाम्बिया देशाचे रहिवाशी आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या बोटीतून 150 पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यातील 83 जणांनी पोहून आपला जीव वाचविला आहे. या अपघाताची माहिती मिळताच युएन मायग्रेशन एजन्सीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 58 जणांचे मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (हेही वाचा - नर्मदा नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, 36 जणांची प्रकृती गंभीर)
आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्थेच्या माहितीनुसार, अटलांटिक महासागरात पश्चिम ऑफ्रिकेतील मौरिटेनिया या देशाच्या जवळ आल्यानंतर या बोटीतील इंधन संपले होते. या बोटीत अनेक लहान मुले आणि महिला प्रवास करत होत्या. अपघातग्रस्त बोट 27 नोव्हेंबरला सेनेगलच्या शेजारील गाम्बिया देशातून युरोपला निघाली होती.
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदीपात्रात बोट उलटून 40 जण जखमी
2017 मध्येही स्थलांतरित शरणार्थींची बोट उलटून देऊन 200 लोकांच्या मृत्यू झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या 56 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. या दोषींना 14 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली होती.