Boat Accident in Narmada River: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे नर्मदा नदीत बोट उलटून अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात 40 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले होते. मात्र अपघातात सहा जणांचा मृत्यू होऊन इतर 36 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
नर्मदा नदीत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीत एकूण 62 प्रवासी होते. बोटीतील प्रवासी फेरफटका मारण्यापूर्वी मकरसंक्रांती निमित्त अंघोळ करण्यास नदीपात्रात गेले होते. दरम्यान, भुषा डॅमजवळ अचानक बोट उलटली गेली. परंतु बोट उलटल्यामागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. (हेही वाचा-नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदीपात्रात बोट उलटून 40 जण जखमी)
Maharashtra: Six people died after a boat capsized in Narmada river in Nandurbar district today. More details awaited. pic.twitter.com/wfv5PzVFVf
— ANI (@ANI) January 15, 2019
या प्रकरणी मदत आणि बचाब कार्य करुन ग्रामस्थांना बाहेर काढण्यात आले. तर अधिक गंभीर झालेल्या रुग्णांना उपाचारासाठी नंदुरबार आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटना घडलेले ठिकाण अत्यंत दुर्गम भागात असल्याने त्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा येत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.