Sanitizer: पार्टीमध्ये दारु संपली म्हणून चक्क सॅनिटायझरच प्यायले; सात जणांचा मृत्यू तर, 2 जण कोमात
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

व्यसन ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कधी काय करेल? याचा काय भरवसा नाही. यातच रशियातील (Rusia) एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पार्टीमध्ये दारू संपल्यामुळे काही जणांनी चक्क सॅनिटायझरच प्यायले आहेत. ज्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 जण कोमात गेल्याची माहिती उघडकीस आली आहे. तातिन्सकी (Tattinsky) जिल्ह्यातील तोमतोर (Tomtor) गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रशिया सरकार नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती डेलीमेलने आपल्या वृत्तात दिली आहे.

दारु संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी सॅनिटायझरचे प्राशन केले. त्यानंतर तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, सहा जणांना एअर क्राफ्टच्या मदतीने स्थानिक राजधानी याकुत्स्क येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण कोमात गेले आहेत. संबंधित लोकांना प्राशन केलेल्या सॅनिटायझरमध्ये तब्बल 60 टक्के मिथेनॉल असल्याचे समजत आहे. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहचून विषबाधेबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रशियन सरकारने सॅनिटायझरचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. हे देखील वाचा- Colombian Drug Cartel: ड्रगच्या तस्करीसाठी लढवली शक्कल; महिलांमध्ये केले लिक्विड कोकेनचे Breast Implants, कोलंबियन ड्रग टोळीचा पर्दाफाश

लॉकडाऊन दरम्यान दारू मिळत नसल्याने अनेकांनी सॅनिटायझरचे प्राशन केल्याची माहिती समोर आली होती. भारतातही दारु मिळत नसल्याने दक्षिणात्य राज्यात सॅनिटायझर प्यायले म्हणून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकट आल्यानंतर संपूर्ण जगाभरात सॅनिटायझरचा वापरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. एवढेच नव्हेतर, काही मेडिकलमधील सॅनिटायझरचा साठा पूर्णपणे संपला होता.