Kim Jong-un | (Photo credit: archived, edited, symbolic images)

North Korea Parliamentary Election: उत्तर कोरिया (North Korea) देशात नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. हुकुमशाहा किम जोंग उन (Kim Jong-un) याने केवळ जगाला दाखवण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक घेतली. ही निवडणूक म्हणजे केवळ एक नाटक ठरले. या निवडणूकीत किम जोंग उन हाच एकमेव उमेदवार होता. किमच्या विरोधात एकही अर्ज भरला गेला नाही. त्यामुळे ही निवडणूक मतदानापूर्वीच बिनविरोध झाली होती. तरीदेखील हट्टी किमने निवडणुकीचे सर्व सोपस्कर पार पाडले. एका उमेदवारासाठी अवघ्या देशाने मतदानाचा हक्क बजावला. पाठिमागच्या वेळी निवडणूक झाली तेव्हा 99.77 टक्के नागरिकांनी मतदान केले होते. या वेळी गेल्यावेळच्या तुलनेत अधिक लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकांच्या इतिहासात ही निवडणूक Rubber- Stamp Election म्हणून ओळखली जाते.

उत्तर कोरियातील लाखो लोक 'सुप्रीम पिपल्स अॅसेंब्ली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेच्या निवडणुकीला दर पाच वर्षांनी सामोरी जाते. उत्तर कोरियाची अधिकृत केसीएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या वेळी मतदान करणाऱ्या नागरिकांची संख्या 100 टक्क्याला काहीशी कमी आहे. जे लोक देशाबाहेर आहेत ते मतदान करु शकले नाहीत. त्यामुळे 100 टक्के मतदान होऊ शकले नाही, असे केसीएनएने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, भूक लागली तर कपडे खा! किम जोंग-उन याने लॉन्च केले फॅशन प्रॉडॉक्ट)

किम जोंग उन याचा जन्म 8 जानेवारी 1983 मध्ये झाला. सध्या तो उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता आहे. तो किम जोंग इल यांचा मुलगा तर किम सुंग याचा नातू आहे. 28 डिसेंबर 2011 मध्ये तो उत्तर कोरियाचा हुकुमशाहा बनला. हुकुमशाहा बनताच त्याने तशी अधिकृत घोषणाही केली.