Richest Man in the World: जगातील श्रीमंतांच्या यादीत (Richest Man in the World) तीन दिवसांत तीन मोठे बदल झाले आहेत. यापूर्वी एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. दोन दिवसांपूर्वी जेफ बेझोस यांनी त्यांच्याकडून नंबर वन अब्जाधीशाचा मुकुट हिसकावून घेतला. आता आज बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) जेफ बेझोसला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जेफ बेझोस आता 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट 197 अब्ज डॉलर्ससह अव्वल स्थानावर आहेत. निर्देशांकानुसार, हे अनेक वर्षांनंतर घडले आहे, जेव्हा जगातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीची संपत्ती 200 अब्ज डॉलर्स नाही.
अशाप्रकारे जगात सर्वाधिक संपत्ती कोणाकडे आहे, या प्रश्नाचे उत्तर गेल्या तीन दिवसांत तिसऱ्यांदा बदलले आहे. लुई व्हिटॉन (LMVH) सारख्या लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती सध्या जगात सर्वाधिक आहे. अरनॉल्ट आणि त्याच्या कुटुंबाचा लुई व्हिटॉन कंपनीत 47.5% हिस्सा आहे. त्यांच्याकडे सध्या 70 पेक्षा जास्त ब्रँड आहेत.
एक दिवस आधी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले जेफ बेझोस काही काळच पहिल्या स्थानावर राहू शकले. प्रदीर्घ काळ पहिल्या स्थानावर राहिलेल्या इलॉन मस्कची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एलोन मस्कची एकूण संपत्ती सध्या $189 अब्ज आहे. चौथ्या स्थानावर मेटाचे सीइओ मार्क झुकरबर्ग, त्यानंतर पाचव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत. (हेही वाचा: Japan Will Disappear: जगाच्या नकाश्यावरून जपान लवकरच गायब होणार! इलॉन मस्कचा दावा)
मात्र फोर्ब्सच्या रिअलटाइम इंडेक्सवर चित्र थोडे वेगळे आहे. या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या स्थानावर आहे, परंतु त्यांची एकूण संपत्ती 227.6 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. इलॉन मस्क या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 195.8 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, जेफ बेझोस यांची संपत्ती $194.6 अब्ज आहे आणि ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत अजूनही अमेरिकेचे वर्चस्व आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्हींच्या टॉप-5 श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेबाहेरील एकच नाव आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट वगळता इतर चार श्रीमंत लोक अमेरिकेतील आहेत. भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, $117.1 अब्ज संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग यादीत, ते 114 अब्ज डॉलर्ससह 11 व्या स्थानावर आहेत.