अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden विमानात चढताना घसरले (Watch Video)
President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One (Photo Credits: Twitter)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) विमानाच्या पायऱ्या चढताना घसरुन पडले. यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ (Video) समोर आला असून तो वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. एकदा नव्हे तर दोनदा त्यांचा पाय घसरला आणि ते अडखळले. मात्र तरीही स्वत:ला सावरत ते विमानात चढून गेले. (PM Narendra Modi यांनी US President Joe Biden सह First Lady ला दिलं भारत भेटीचं आमंत्रण; पहिल्यांदाच झाली फोनवरून चर्चा)

जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे 'एअर फोर्स वन' (Air Force One) या विमानात चढत होते. मात्र चढताना मध्येच त्यांचा पाय घसला. ते उठले मात्र पुन्हा अडखळले. त्यातून सावरताना त्यांना डगमगले. मात्र त्यानंतर स्वत:  सांभाळत ते उठून वर चालत गेले. इतकंच नाही तर त्यांनी मागे वळून सॅल्यूटही केला. जो बायडेन अटलांटा दौऱ्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान हा प्रकार घडला.

पहा व्हिडिओ:

व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कैरीन जीन यांनी या प्रकाराबद्दल माहिती देताना सांगितले की, "जो बायडन यांचा पाय घसरला असला तरी ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. वारा वेगाने वाहत असल्याने त्यांचा पाय घसरला असावा." दरम्यान, एअर फोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजले जाते. 78 वर्षीय जो बायडन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असून 20 जानेवारी 2021 रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे.