PM Narendra Modi यांनी  US President Joe Biden सह First Lady ला दिलं भारत भेटीचं आमंत्रण; पहिल्यांदाच झाली फोनवरून चर्चा
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची काल (8 फेब्रुवारी) अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्यासोबत टेलिफोनवर बातचीत झाली आहे. दरम्यान बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच फोनवरून अशाप्रकारे संपर्क केला आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फस्ट लेडी डॉ. जिल बायडन (Dr Jill Biden) यांना भारत भेटीचं आमंत्रण दिले आहे.

संभाषणानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे. ' जो बायडेन यांना शुभेच्छा देत त्यांनी दोन्ही देशांमधील प्रादेशिक मुद्दे आणि दोन्ही देशांच्या दृष्टीने प्राधान्य असलेल्या विषयावर आम्ही चर्चा केली. पर्यावरण बदलाविरोधात दोन्ही देश परस्परांना सहकार्य करतील असे देखील त्यांनी म्हटलं आहे. Kashmir American Day: न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीमध्ये 'काश्मीर-अमेरिका दिन' साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता; भारताने व्यक्त केली चिंता.

नरेंद्र मोदी ट्वीट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यांनी कारभार सांभाळण्यास सुरूवात केल्यानंतर ट्रम्प सरकारने रद्द केलेल्या अनेक जुन्या निर्णयांना पुन्हा लागू केले आहे. त्यामुळे आता भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींवर यावेळेस चर्चा झाली. कोविड19 संकटाशी सामना करताना सहकार्य करण्याचे देखील त्यांनी यावेळेस माहिती दिली आहे.